शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता संघर्ष संपला, आता विकासासाठी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 05:00 IST

तीन महिन्यांच्या  दीर्घ प्रतीक्षेनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणीचा मुहूर्त निघाला. १० मे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची तर १९ मे रोजी विषय समिती सभापती पदाची निवडणूक पार पडली. आता सत्ता स्थापन झाली. पदाधिकारी विराजमान झाले. जिल्हा परिषदेत वर्दळ वाढली. पदाधिकाऱ्यांनी  कामाला सुरुवातही केली आहे. काही नवखे आणि काही अनुभवी अशा पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आता जिल्हा परिषदेचा कारभार चालविला जाणार आहे. सर्वसामान्य ग्रामीण जनतेला या पदाधिकाऱ्यांकडून विकासाची मोठी अपेक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तब्बल दोन वर्षांचे प्रशासकराज आणि निवडणुकीनंतर तीन महिने चाललेला सत्तासंघर्ष एकदाचा संपला. जिल्हा परिषदेत अध्यक्षांसह पदाधिकारी विराजमान झाले. आपसातील मतभेद विसरून ग्रामीण विकासासाठी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे. ग्रामीण जनतेची ही अपेक्षा आता पदाधिकारी कसे पूर्ण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भंडारा जिल्हा परिषदेची मुदत १५ जुलै २०२० रोजी संपली. मात्र कोरोना संसर्गामुळे निवडणुका घेणे शक्य नव्हते. जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. तब्बल दोन वर्षे जिल्हा परिषदेत प्रशासकराज होते. अधिकाऱ्यांच्या मनमर्जीने जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचा कारभार सुरू होता. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास रखडल्याची सर्वत्र ओरड होती. अधिकारी आमचे ऐकत नाहीत, असे अनेक जण सांगत होते. प्रशासकराज कधी समाप्त होणार, याची उत्सुकता लागली होती.अखेर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाली. मात्र ओबीसी आरक्षणाने ही निवडणूक दोन टप्प्यात घ्यावी लागली. २१ डिसेंबर आणि १८ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसाठी मतदान झाले. १९ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडली. परंतु पुन्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आला. पदाधिकाऱ्यांची निवड लांबली. निवडून आलेल्या सदस्यांसह राजकीय नेतेही अस्वस्थ झाले होते. तीन महिन्यांच्या  दीर्घ प्रतीक्षेनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणीचा मुहूर्त निघाला. १० मे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची तर १९ मे रोजी विषय समिती सभापती पदाची निवडणूक पार पडली.आता सत्ता स्थापन झाली. पदाधिकारी विराजमान झाले. जिल्हा परिषदेत वर्दळ वाढली. पदाधिकाऱ्यांनी  कामाला सुरुवातही केली आहे. काही नवखे आणि काही अनुभवी अशा पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आता जिल्हा परिषदेचा कारभार चालविला जाणार आहे. सर्वसामान्य ग्रामीण जनतेला या पदाधिकाऱ्यांकडून विकासाची मोठी अपेक्षा आहे.

निधीच्या संतुलित विनियोगाचे मोठे दिव्य

- ग्रामीण विकासासाठी शासनाकडून आलेला निधी योग्य प्रमाणात आणि संतुलित पद्धतीने विकास कामांवर खर्च करण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे.- दोन वर्षे प्रशासकराज काळात जिल्हा परिषदेच्या निधीचा झालेला अपव्यय शोधून संबंधितांवर कारवाई करण्याचे धाडस पदाधिकाऱ्यांना दाखवावे लागणार आहे.- जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ग्रामीण भागातील शिक्षणाची काय अवस्था आहे, हे त्यांना पुरते ठाऊक आहे. स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळा स्मार्ट कशा होतील, याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

जिल्हा परिषदेचा आखाडा होवू नये- सत्ता स्थापनेच्या नाट्यात सभागृहात हाणामारी झाली. प्रकरण पोलिसापर्यंत गेले. आगामी काळातही याचे पडसाद निश्यितच जिल्हा परिषदेत उमटणार आहेत.  राष्ट्रवादीचा सत्तेचा तोंडाशी आलेला घास हिसकावला गेला. त्यामुळे राष्ट्रवादीचे सदस्य कायम आक्रमक राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये बंडखोरी झाल्याने मूळ भाजपचे सात सदस्यही सत्ताधारी पक्षाला कायम घेरण्याच्या प्रयत्नात राहणार आहेत. परिणामी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक बैठका वादळी ठरणार आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना जिल्हा परिषदेचा राजकीय आखाडा होवून नये, अशी अपेक्षा आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद