शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी राजकीय वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST

दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकराजनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. २१ डिसेंबर व १८ जानेवारी अशा दोन टप्प्यांत ही निवडणूक घेण्यात आली. १९ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडली. यात काँग्रेस २१, राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना १, बसपा १ आणि अपक्ष ४ असे सदस्य निवडून आले. निकाल घोषित होताच, सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला होता. मात्र, ग्रामविकास मंत्रालयाने अधिसूचना जारी केली नाही. परिणामी, सत्तास्थापना रखडली.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा मुहूर्त अखेर एकदाचा निघाला आणि अध्यक्ष निवडीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. कुण्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने कोण कुणासोबत बसणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. नेत्यांनी अद्यापही मौन साधले असल्याने संभ्रम कायम आहे. आता येत्या १० मे रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींची निवड होणार असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकराजनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. २१ डिसेंबर व १८ जानेवारी अशा दोन टप्प्यांत ही निवडणूक घेण्यात आली. १९ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडली. यात काँग्रेस २१, राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना १, बसपा १ आणि अपक्ष ४ असे सदस्य निवडून आले. निकाल घोषित होताच, सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला होता. मात्र, ग्रामविकास मंत्रालयाने अधिसूचना जारी केली नाही. परिणामी, सत्तास्थापना रखडली. तब्बल तीन महिन्यांनंतर ग्रामविकास मंत्रालयाने याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश दिला. त्यावरून पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण काढण्यात आले आणि जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. आता कोण कुणासोबत बसणार, याची प्रचंड उत्सुकता आहे. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसकडे २१ जागा आहेत, तर समविचारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे १३ जागा आहेत. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र आले, तर सहज सत्ता स्थापन करता येऊ शकते. महाविकास आघाडीचा प्रयोग राबविल्यास शिवसेनेची त्यात भर पडेल, तसेच चार अपक्षही सत्तेसोबत जाऊ शकतात. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार की नाही, याबाबत कुणीही बोलायला तयार नाही, परंतु पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करेल, अशी माहिती आहे. दुसरीकडे १२ सदस्य असलेल्या भाजपनेही सत्ता स्थापनेसाठी चाचपणी केली आहे. मात्र नेमकी कुणाची सत्ता जिल्हापरिषदेत स्थापन होणार हे गुलदस्त्यात असून इच्छूक मात्र आपल्या नेत्यांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी करीत आहेत.

अशी आहे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया- जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड १० मे रोजी भंडारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात होणार आहे. यासाठी विशेष सभा आयोजित केली जाईल. सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारणे, दुपारी २ वाजता विशेष सभेला सुरुवात, दुपारी २ ते २.१५ या वेळात नामनिर्देशनपत्राची छाननी, दुपारी २.१५ ते २.३० पर्यंत उमेदवारी मागे घेणे आणि आवश्यक असल्यास दुपारी २.३० वाजता मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आदेश निर्गमित केला आहे.

पं.स. सभापतीसाठी  सुरू झाली चढाओढ- जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड १० मे रोजी भंडारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात होणार आहे. यासाठी विशेष सभा आयोजित केली जाईल. सभापतीपदाच्या आरक्षण सोडतीने अनेकांचे स्वप्न भंगले असले तरी काहींना लाॅटरी लागली आहे. आता सभापतीपद मिळावे म्हणून चढाओढ सुरू आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद