शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

सावकाराने बळकावलेली जमीन मिळेल परत; शेतकऱ्यांनो, तक्रार करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 13:25 IST

Bhandara : वार्षिक ३६ टक्के व्याज आकारणी तक्रारीवर उपनिबंधक करणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क : भंडारा : जिल्ह्यात सातत्याच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बेजार आहे. पिकांचे नुकसान, नापिकी आणि बँकेचे कर्ज, मुलांचे विवाह, मुलांचे शिक्षण, दवाखान्याचा खर्च अशा संकटांतील शेतकरी सावकाराचा दरवाजा ठोठावतो; पण समोरच्याची गरज पाहून सावकार तीन ते पाच टक्क्यांनी पैसे देतो. सहा महिने किंवा एक वर्षाला चक्रवाढ व्याज आकारतो. याप्रसंगी तारण ठेवलेली जमीनही बळकावतो.

सावकाराने बळकावलेली जमीन शेतकऱ्यांना परत प्राप्त करता येते. यासाठी त्यांना जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करावी लागते. सावकाराचे कर्ज शेतातील पिकातून कमी होईल आणि आपली जमीन पुन्हा परत मिळेल, या आशेने शेतकरी रक्ताचे पाणी करून पिकाला जपतो. आता अवैधरीत्या अधिक दराने कर्ज देणाऱ्या बचत गटांवरही कारवाई केली जाणार आहे.

अर्ज कुठे आणि कसा करायचा?शेतकऱ्यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार अर्ज करावा लागतो. गोपनीय पद्धतीने अर्ज करायचा असतो. अर्ज केल्याच्या तारखेपासून १५ वर्षे मागे संबंधित जमिनीची रजिस्ट्री झाली असल्यास महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत शेतकऱ्याला न्याय मिळतो.

जिल्ह्यात नोंदणी केलेले २७६ सावकारजिल्हा उपनिबंधक कार्यालयात नोंदणी केलेले २७६ सावकार जिल्ह्यात आहेत. हे सावकार गरजूंना कर्ज उपलब्ध करून देतात. यामुळे त्यांना मदत मिळते; परंतु दिलेले कर्ज वसूल करताना अनेकजण तगादा लावतात, बळजबरी करतात.

मुद्दल रकमेपेक्षा जास्त व्याज घेता येत नाहीसावकारीचा परवाना मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला दुसऱ्या क्षेत्रात सावकारी करता येत नाही. तसेच कर्जदाराकडून सरळ व्याज पद्धतीने व्याज आकारायचे असून, चक्रवाढ पद्धत लागू नाही. मुद्दल रकमेपेक्षा जास्त व्याज सावकाराला घेता येत नाही. एखादी व्यक्ती विनापरवाना सावकारी करीत असल्यास जिल्हा निबंधक किवा सहायक निबंधक कधीही वॉरंटशिवाय प्रवेश करून चौकशी करू शकतात.

सावकार किती व्याज घेऊ शकतात?■ सहकार विभागाने १६ सप्टेंबर २०१४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार सावकारी कर्जावरील व्याजदर निश्चित केलेला आहे.■ सावकाराने शेतकऱ्याला दिलेल्या तारण कर्जाला प्रतिवर्ष ९ टक्के आणि विनातारण कर्जाला प्रतिवर्ष १२ टक्के व्याजदर ठरलेला आहे.■ शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना कर्ज देताना तारण कर्जाला प्रतिवर्ष १५ टक्के आणि विनातारण कर्जाला १८ टक्के व्याजदर आकारण्याची अट कायद्यात आहे.

...तर बचत गटांवर होणार कारवाईजिल्ह्यात सावकारांनी ठरवून दिलेल्या व्याजारपेक्षा अधिक व्याज शेतकऱ्यांकडून घेतल्यास करवाई केली जाते. जिल्ह्यात काही बचत गटांकडून अवैध सावकारी होत आहे

टॅग्स :Farmerशेतकरीfarmingशेतीbhandara-acभंडारा