शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गूळ निर्मितीतून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 05:00 IST

महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीपात्राच्या खोऱ्यात दोन्ही राज्यातील शेतकरी मागील २०० वर्षांपासून ऊस लागवड करीत आहेत. ऊस विक्री करणे व मोबदला बराच वेळ लागत असल्याने त्यातून मार्ग काढण्याकरिता दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांनी गूळ निर्मितीतून शासकीय मदतीविना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली आहे. तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गावात व मध्य प्रदेशातील सीमावर्ती गावात अशी गूळ निर्मिती उद्योगांची संख्या (गुऱ्हाळ) सुमारे १०० पेक्षा अधिक आहे.

मोहन भोयरलाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीपात्राच्या खोऱ्यात दोन्ही राज्यातील शेतकरी मागील २०० वर्षांपासून ऊस लागवड करीत आहेत. ऊस विक्री करणे व मोबदला बराच वेळ लागत असल्याने त्यातून मार्ग काढण्याकरिता दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांनी गूळ निर्मितीतून शासकीय मदतीविना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली आहे. तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गावात व मध्य प्रदेशातील सीमावर्ती गावात अशी गूळ निर्मिती उद्योगांची संख्या (गुऱ्हाळ) सुमारे १०० पेक्षा अधिक आहे.तुमसर तालुक्यातील देवनारा, चांद मारा, लोभी, आष्टी, पाथरी, धुटे रा, कवलेवाडा, घानोड, सक्करधरा, सोंड्या टोला इत्यादी गावे नदीकाठावर असून मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील गोरे घाट, बड पाणी, महके पार, अंजनविहिरी, दिगघा, बाम्हणी, पुलप्पू ट्टा, हरदोली, छ तेरा, टेकाडी इत्यादी गावे आहेत. या गावात ऊसाची शेती मागील दोनशे वर्षांपासून करणे सुरू आहे. गावातील कोहळी समाज बांधवांची या परिसरात मोठी संख्या आहे. ऊसशेती लागवड करण्यात त्यांचा हातखंडा आहे.  शेतकरी ऊसाची लागवड करीत असल्यामुळे त्यांना ऊसाचे भरघोस उत्पादन होते. परंतु हा ऊस विक्री करण्यास त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच ऊस विक्री केल्यानंतर त्याचा मोबदला मिळण्यास बराच विलंब होतो.  येथील शेतकऱ्यांनी ऊस उद्योग निर्माण करण्यावर भर देऊन गूळ उद्योगाची निर्मिती केली.  आष्टीचे माजी सरपंच व शेतकरी डॉ. अमृत सोनवणे यांनी सांगितले की बावनथडी नदीखोऱ्यात महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील शेतकरी मागील २०० ते २५९ वर्षांपासून ऊसाची शेती करीत असून येथे मोठ्या प्रमाणात गूळ निर्मिती करण्यात येते. ७०  वर्षांपूर्वी या परिसरात विद्युतीकरण झाले नव्हते. तेव्हा ऊसाचा रस काढण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या क्रशरला बैल उपयोगात आणले जात होते. त्यानंतर डिझेल आणि क्रूड ऑइलच्या मदतीने  क्रशरचा उपयोग करण्यात येऊन ऊसापासून रस काढण्यात येत होता.

शासनाकडून मदत नाही- येथील शेतकऱ्यांनी गूळ उद्योग निर्मिती केली. शेकडो महिला व पुरुषांना रोजगार मिळत आहे.  परंतु शासनाकडून त्यांना अद्याप कोणतीच मदत मिळत नाही. ऊस गाळप हंगाम डिसेंबर ते मार्च महिन्यापर्यंत सुरू राहते. दोन्ही राज्याच्या सीमावर्ती भागात गूळ निर्मिती केंद्राची संख्या १०० पेक्षा अधिक आहे हे विशेष.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती