शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पीकविमा कंपनीचा हेल्पलाइन नंबरच व्यस्त; नोंदणी होईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 13:32 IST

Bhandara : नोंदणी करताना अडचण, शेतकऱ्यांच्या नाकीनव

लोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर : शुक्रवार व शनिवारला लाखनी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी लागली. त्यामुळे कापलेले धान अर्थात कडपा पाण्यात भिजल्या. पिकविमा घेतलेल्या शेतकऱ्यांनी कृषी व महसूल विभाग तसेच पीकविमा कंपनीच्या अभिकर्त्यांशी संपर्क साधला.

सर्वांनी पिकविमा कंपनीच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचा सल्ला दिला. संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार प्रयत्न करून सुद्धा अॅपला नोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी कंटाळला आहे. अखेर पीकविमा काय कामाचा? असाच प्रश्न शेतकरी विचारीत आहे. 

संकटकालीन स्थितीत पिकविमा कामात यावा हा खरा हेतू निष्फळ ठरत आहे. तालुक्यातील बऱ्याच गावात कनेक्टिव्हिटीचा प्रश्न ऐरणीवर आहे. कित्येक शेतकऱ्यांजवळ स्मार्टफोन नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना स्मार्टफोनचा वापर करता येत नाही. शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत पीकविमा कंपनीच्या वेबसाइटवर नोंद करणे अत्यावश्यक समजले आहे. मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वास्तव समस्यांमुळे संबंधित विमाकंपनीच्या वेबसाइटवर नुकसान नोंदविणे वेळेत शक्य होत नाही. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान मिळणे अशक्य आहे. 

गतवर्षीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कृषी विभागाच्यावतीने पंचनामेही करण्यात आले. मात्र भरपाई मिळालेली नाही. विमा कंपन्यांनी भरपाईकडे दुर्लक्ष केल्याचे दिसले. 

"प्रत्येक शेतकऱ्यांना कंपनीचा अभिकर्ता ७२ तासांत भेटणे शक्य नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत अॅपवर नुकसान नोंदविणे अशक्यच दिसत आहे. संपूर्ण भारतभर १४४४७ हा एकच हेल्पनंबर आहे. काही ठिकाणी कव्हरेजचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे नोंदणीला अडचण जात आहे." - अनुराग गजभिये, पीकविमा अभिकर्ता

"कापणी झालेल्या धानाच्या कडपा पावसाने भिजल्या. माहितीनुसार हेल्पलाइन नंबरची संपर्क केला. मात्र दिवसभरात संपर्क न झाल्याने नोंद होऊ शकली नाही. शासन व प्रशासनाने स्थानिक स्तरावर किंवा सेवा सहकारी संस्थेत नोंदणीचे अधिकार द्यावे." - बबलू वैरागडे, प्रभावित शेतकरी, पालांदूर

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAgriculture Sectorशेती क्षेत्रbhandara-acभंडारा