शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी उपोषण करणाऱ्या तिघांची प्रकृती खालावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 14:29 IST

Bhandara : प्रकल्पग्रस्त म्हणतात, पालकमंत्र्यांशी बैठक लावा, समस्या सोडवा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने गांधी जयंतीपासून आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. यामध्ये तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून, प्रशासनाने याबाबत कुठलीही दखल घेतलेली नाही. दरम्यान शनिवारी पालकमंत्री भंडाऱ्यात येत असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठक लावावी, अशा प्रकारचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना उपोषणकर्त्यांनी दिले आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त नौकरीकरिता प्रमाणपत्र देण्यात आले होते. ते २०२२-२३ पासून रद्द करण्यात आले होते, ते पूर्ववत बहाल करण्यात यावे, वाढीव कुटुंबांतर्गत पात्र व्यक्तीला दोन लाख ९० हजारांची मदत देण्यात यावी, गोसेखुर्द बाधीत भूमिहीनांना शेतजमीन देण्यात यावी, प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे, त्या गावांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे आणि ज्यांची ७५ टक्के शेतजमीन संपादित झाली आहे, अशा गावांचे शासन निर्णयानुसार पुनर्वसन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 

आमरण उपोषण करणाऱ्यांमध्ये संघर्ष समितीचे अध्यक्ष भाऊ कातोरे, सचिव शेषराज रामटेके, अतुल राघोर्ते, सुनील भोपे, प्रमिला शहारे, मंगेश पडोळे, कमलेश सुखदेवे, बालू ठवकर, पुरुषोत्तम गायधने, मयुरी सुखदेवे, दिनेश राघोर्ते व नखातेंचा समावेश आहे. दरम्यान सुरू असलेल्या आंदोलनाला तीन दिवस लोटूनही अधिकारी भेट देण्यासाठी आले नाही. 

घेतली निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट आंदोलनकर्त्यांचा शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांची दुपारी भेट घेतली आणि निवेदन सादर केले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या रास्त असूनही प्रशासन आणि सरकार मनावर घेत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. या आंदोलनाची व मागणीची तीव्रता प्रशासनाने लक्षात घ्यावी आणि सरकारच्या कानावर टाकून या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रमिला शहारे, जयश्री वंजारी, शेषराज रामटेके, वर्षा वंजारी, अतुल राघोर्ते तसेच सुरेवाडा, खमारी व कोथुर्णातील ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :bhandara-acभंडाराStrikeसंप