शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 363 ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2022 21:22 IST

जिल्ह्यात आता १८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय क्षेत्र चांगलेच तापणार आहे. सरपंच पदासाठी थेट निवडणूक होणार असल्याने गावागावात चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. अटीतटीच्या लढतीत गावातील राजकारणही चांगलेच ढवळून निघेल, यात काही शंका नाही. दरम्यान चातकासारखी निवडणूक घोषणेची वाट बघणारे हवसे- नवसेही आता कामाला भिडणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऑक्टोबरच्या मध्यात कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील ५४० ग्रामपंचायतींपैकी ३६३ ग्रामपंचायतींतील सदस्य व सरपंच पदासाठी १८ डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीचा आजपासून बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी याबाबतची अधिसूचना जाहीर करताच जिल्ह्यात (शहरी भाग वगळता) आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे.  निवडणूक आयोगाने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कार्यकाळ पूर्ण केलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जिल्ह्यात आता १८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय क्षेत्र चांगलेच तापणार आहे. सरपंच पदासाठी थेट निवडणूक होणार असल्याने गावागावात चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. अटीतटीच्या लढतीत गावातील राजकारणही चांगलेच ढवळून निघेल, यात काही शंका नाही. दरम्यान चातकासारखी निवडणूक घोषणेची वाट बघणारे हवसे- नवसेही आता कामाला भिडणार आहेत. निवडणूक आयोगाने बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून सोबतच या ग्रामपंचायतीवर जिल्हा प्रशासनाकडून प्रशासक नियुकत करण्यात आले आहे. दरम्यान गावातील टपऱ्यांवर फक्त निवडणुकीचीच चर्चा ऐकायला मिळणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

- ताज्या निवडणूक वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील ३६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची अधिसूचना संबंधित भागातील तहसीलदारांकडून १८ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात येणार आहे. १८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील. उमेदवारी अर्जांची छाननी ५ डिसेंबरला होणार आहे. ७ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भंडारा जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्रामपंचायतींची संख्या ५० टक्क्यांहून अधिक असल्याने संपूर्ण भंडारा जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, शहरी भागात याची अंमलबजावणी होणार नाही.- श्रीपती मोरे, उपजिल्हाधिकारी (महसूल), भंडारा

तुमसर तालुक्यातील सर्वाधिक ७७ ग्रामपंचायती- ३६३ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ७७ ग्रामपंचायती तुमसर तालुक्यातील आहेत. तसेच भंडारा तालुक्यातील ३९, लाखनी व लाखांदूर तालुक्यात प्रत्येकी ५१, मोहाडी ५८, पवनी ४६ तर साकोली तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत