लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : साकोली तालुक्यातील महामार्ग लगत असलेला जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील तलावाची पाळ फुटली. यामुळे परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
फुटलेल्या पाळीतून वाहणारे तलावाचे पाणी साकोली व गड़कुंभली गावातील सुमारे 300 हेक्टर क्षेत्रातून वाहत आहे यामुळे या परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन घरांमध्ये हे पाणी शिरले असून कुठेही जीवितहानीची घटना नाही. या वाहत्या पाण्यामुळे नाल्यांना पूर आल्यामुळे लाखांदूर मार्ग बंद पडल्याची माहिती आहे.