लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील राजेगाव (एमआयडीसी) येथील हिंदुस्तान कॉम्पोझिट कंपनीतील कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत तीन दिवसांपासून उपोषणकर्त्याकडे प्रशासनाने पाठ फिरवली. त्यामुळे बुधवारी तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. न्याय मिळेपर्यत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा असल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
कामगार न्यायालयाने यूएलपी १८/२२ प्रकरणात स्थगनादेश देत, संबंधित कामगारांना कामावरून काढू नये, असे आदेश दिले आहेत. मात्र, न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कंपनीने संबंधित २१ कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता ९ मार्च २०२४ पासून कामावर हजर होण्यास मनाई केल्याचे सांगण्यात आले.
२१ कामगार बसले आहेत आमरण उपोषणावरया अन्यायाविरोधात २१ कामगारांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सूरज दुबे, संजय हटवार, अतुल चोपकर, अमित खेडीकर, समीर मस्के, मुकेश कोल्हे, मनोहर दारवाटे, सोमेश खोत, श्रीधर भोयर, हर्शील मेश्राम, सूरज टेभुर्णे, मंगेश गिदमारे, वासुदेव राखडे, सेवक तुरस्कर, ईश्वर लोंदासे, प्रशांत बांते, स्वप्निल शेंडे, अविनाश झालपुरे, भूषण मदनकर, फजल खान, नितेश शेंडे बसले आहेत.
नोटीस दिली नाहीहिंदुस्थान कंपोझीट कंपनीत कार्यरत असलेल्या या कामगारांना कोणतीही पुर्व सुचना वा नोटीस न देता कामावर येण्यास मनाई करण्यात आली. परिणामी या कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. कंपनी प्रशासनाची ही एक प्रकारची दादागिरीच असल्याचे बोलले जाते.