शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वाटमारी, घरफोडी, सराफा दुकानात चोरीने दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:00 IST

साकोली येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे आहे. यासोबतच पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात असतो. तरीही चोरी व वाटमारीच्या घटनात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गत दोन वर्षांपूर्वी विर्शी येथे बँकेत चोरी झाली होती. चोरट्यांनी लाॅकर शेतात नेऊन गॅस कटरच्या सहाय्याने फोडले होते. रोख व दागिने लंपास केले होते. यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात साकोलीच्या बँक ऑफ इंडिया शाखेत चोरी झाली.

संजय साठवणेलाेकमत न्यूज नेटवर्कसाकोली : आठवडाभरापूर्वी झालेल्या वाटमारीची शाई वाळत नाही तोच शहरातील दोन सराफा दुकानासह एका डेअरीत चोरी झाली. यापूर्वीही तालुक्यात मोठ्या चोऱ्या झाल्या असून साकोलीची बँक ऑफ इंडिया आणि सानगडीच्या बँकेत चोरी झाली होती. दिवसेंदिवस चोरीच्या घटनात सातत्याने वाढ होत असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या रात्रगस्तीचा उपयोग काय असा प्रश्न आता निर्माण होत आहे.साकोली येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे आहे. यासोबतच पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात असतो. तरीही चोरी व वाटमारीच्या घटनात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गत दोन वर्षांपूर्वी विर्शी येथे बँकेत चोरी झाली होती. चोरट्यांनी लाॅकर शेतात नेऊन गॅस कटरच्या सहाय्याने फोडले होते. रोख व दागिने लंपास केले होते. यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात साकोलीच्या बँक ऑफ इंडिया शाखेत चोरी झाली. अस्थायी कर्मचाऱ्यानेच बनावट चाबी तयार करुन रोख व सोने पळविले होते. त्यानंतर एकोडी येथील स्टेट बँक व एटीएम फोडले. काही दिवसानंतर सानगडी येथील स्टेट बँक अज्ञात आरोपींनी फोडली. लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. या घटनांचा विसर पडत असतानाच गत आठवड्यात पळसगाव-गोंडउमरी मार्गावर २२ लाख ५० हजार रुपयांची वाटमारी उघडकीस आली. तांदूळ व्यापाऱ्याच्या दिवाणजीला लुटण्यात आले होते. पोलिसांनी अवघ्या २४ तासात आठ जणांना अटक करुन रोख रक्कमही हस्तगत केली होती. याप्रकरणाची चर्चा सुरु असतानाच शहरातील खेडीकर आणि पुष्पम ज्वेलर्स फोडण्यात आले. पाच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. सातत्याने चोरीच्या घटना घडत असताना पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सराफा दुकानातील चोरट्यांचा थांगपत्ता नाही- साकोली येथील खेडीकर ज्वेलर्स आणि पुष्पम ज्वेलर्समध्ये चोरी झाली. चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. परंतु दोन दिवस झाले तरी चोरट्यांचा माग काढण्यात पोलिसांना यश आले नाही. वाटमारी प्रकरणात अवघ्या २४ तासात लुटारुंना पकडून आपली पाठ थोपटून घेणाऱ्या साकोली पोलिसांना या चोरी प्रकरणातील चोरट्यांचा मात्र अद्यापही अंदाज आला नाही.

 

टॅग्स :ThiefचोरRobberyचोरी