शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत मीटरमध्ये छेडछाड, कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : विद्युत मीटरला गैरहजेरीत विद्युत कर्मचाऱ्यांनी छेडछाड केल्याने विद्युत विभागातील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी ...

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : विद्युत मीटरला गैरहजेरीत विद्युत कर्मचाऱ्यांनी छेडछाड केल्याने विद्युत विभागातील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रपरिषदेतून जगदीश निमजे यांनी केली आहे. असून त्या आशयाचे पत्र उपविभागीय अभियंता वीज वितरण कंपनी मोहाडी व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे.येथील गांधी वॉर्डातील वीज ग्राहक जगदीश निमजे यांचे वीज बिल थकीत नसताना व कोणतीही पूर्वसूचना ग्राहकाला न देता विद्युत विभागाच्या चार कर्मचाऱ्यांनी ३१ जानेवारीला वीजबिल न भरल्याचे कारण सांगून वीज जोडणी कापली, मात्र जगदीश निमजे यांच्याकडे कोणत्याही महिन्याचे वीज बिल थकीत नव्हते याची तक्रार निमजे यांनी वीज वितरण कार्यालय तसेच ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. त्यानंतर १८ फेब्रुवारीला पुन्हा दुसरे निवेदन देण्यात आल. त्या निवेदनाच्या आधारे ऊर्जा मंत्री यांनी अधीक्षक अभियंता महावितरण कंपनी यांना एका पत्राद्वारे नमूद बाबीवर उचित कार्यवाही करावी व त्याबाबत मंत्रिमहोदयांना अवगत करावे, असे नमूद करण्यात आले होते, जगदीश निमजे यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये वीज वितरण कार्यालय मोहाडी येथून जानेवारी २०१७ ते आज पर्यंत थकीत असलेल्या वीज ग्राहकांची यादी मागितलेली होती, त्यात वीज वितरण कंपनीने एकही वीज ग्राहक थकीत नसल्याची माहिती दिली, मग माझे वीज कनेक्शन कोणत्या आधारे कापण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला आहेयापूवीर्देखील वर्ष २००७ मध्ये जगदीश निमजे घरी नसताना विद्युत विभागाच्या भरारी पथकाने विद्युत मीटर मध्ये छेडछाड करून जगदीश निमजे यांच्यावर दंड ठोठावला होता, निमजे यांनी त्यावेळी न्यायालयात धाव घेऊन भरारी पथकावर चार्जशीट दाखल करायला भाग पाडले होते. वीज बिल थकित नसताना वीज कनेक्शन का कापण्यात आले तसेच २२ मे रोजी दुपारी तीन वाजता घरी कोणी नाही याची संधी साधून दोन कर्मचाऱ्यांनी घरी येऊन वीज मीटरमध्ये छेडछाड केली. माहिती होताच वीज मीटरमध्ये छेडछाड करण्याची तक्रार वीज वितरण कार्यालय मोहाडी येथे त्याच दिवशी करण्यात आली. त्यामुळे वीज बिल थकीत नसताना वीज जोडणी कापणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाही करावी, अशी मागणी आहे.