शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जलाशयाचे 'टेंडर' दोन संस्थांना मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:00 IST

जलाशयात मासेमारी करून रोजगारांची संधी उपलब्ध करण्यासाठी शासनाने नवीन अध्यादेश काढले आहे. चांदपूर जलाशयाचे टेंडर आता दोन मत्स्यपालन संस्थांना मिळणार आहे. यामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देनवीन अध्यादेश निघाले : रोजगाराच्या संधी वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : जलाशयात मासेमारी करून रोजगारांची संधी उपलब्ध करण्यासाठी शासनाने नवीन अध्यादेश काढले आहे. चांदपूर जलाशयाचे टेंडर आता दोन मत्स्यपालन संस्थांना मिळणार आहे. यामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे.सिहोरा परिसरातील ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात ३२८ हेक्टर आर जागेत विस्तारीत जलाशय आहे. या जलाशयाचे मासेमारी करण्याचे कंत्राट ठेका पद्धतीने देण्यात येत आहे. या जलाशयाचे मासेमारी व मत्स्याची संगोपन एकाच मत्स्यपालन संस्थेला देण्यात आले आहे. एकाच संस्थेला टेंडर देण्यात आले असल्याने सभासदांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आता ही संधी वाढणार आहे. १०० हेक्टर आरपर्यंत असणाऱ्या जलाशयात मासेमारी करण्याचे कंत्राट एकाच संस्थेला मिळणार आहे. यापेक्षा अधिक हेक्टर आर पर्यंत असणारे जलाशयात दोन संस्थांना मासेमारी करिता उपलब्ध केले जाणार आहे. या आशयाचे नवीन अध्यादेश ३० जून २०१७ ला शासनाने काढले आहे. यामुळे चांदपूर जलाशयात आता दोन संस्था मासेमारी करणार आहेत. सिहोरा परिसरात अनेक तलाव आणि जलाशय आहेत. गाव आणि गावाचे शेजारी असणारे तलावात मत्स्यपालन संस्था मासेमारी करीत आहेत. परंतु चांदपूर जलाशयाचे टेंडर प्राप्त करण्यासाठी अन्य मत्स्यपालन संस्था प्रयत्न करीत आहेत. या गावात जलाशय आहे. अशा गावात असणारे मत्स्यपालन संस्थांना टेंडर देणारी अट शिथील करण्यात आली नाही. यामुळे चांदपूर जलाशयाचे टेंडर अन्य गावाचे संस्थांना प्राप्त होण्याचे नाकारता येत नाही.दरम्यान चांदपूर गावात असणारी मागासवर्गीय बहुुउद्देशिय मत्स्यपालन सहकारी संस्थेला या जलाशयाचे टेंडर होते. ३१ मार्च २०१८ ला या संस्थेचे टेंडर संपुष्टात आले आहे. यामुळे नवीन टेंडरप्राप्त करण्यासाठी संस्थेची घोडदौड सुरु झाली आहे.पर्यटन स्थळ बंद आहे. यामुळे जलाशयाचे बोटींग व्यवसाय अडचणीत असले तरी या व्यवसायाची मंजुरी प्राप्त करण्यासाठी संस्थेने पाठपुरावा केला आहे. परंतु शासन स्तरावर एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था करण्यात येत आहे. रोजगाराचे संधी उपलब्ध करणारे चित्र असताना राजकीय इच्छाशक्तीची गरज निर्माण झाली आहे.