शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

आठ वर्षांत आढळले दहा हजार क्षयरुग्ण

By admin | Updated: March 30, 2017 00:34 IST

२१ ते ३० मार्च या कालावधीत जागतिक क्षयदिन जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतो.

६५८ रुग्णांचा मृत्यू : ७ हजार १७३ रुग्ण औषधोपचारानंतर झाले बरेभंडारा : २१ ते ३० मार्च या कालावधीत जागतिक क्षयदिन जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतो. आरोग्य विभाग क्षयरोगावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविल्याचा दावा नेहमी करते. मात्र त्यांचा हा दावा फोल ठरला असून मागील आठ वर्षात जिल्ह्यात ९ हजार ९४७ क्षयरुग्ण आढळले असून यातील तब्बल ६५८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक अहवाल उघडकीस आला आहे. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अ‍ॅडव्होकेसी कॅम्युनिकेशन अ‍ॅण्ड सोशल मोबिलायझेशन प्रभाविपणे राबविण्यात येत असून क्षयरोगावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविल्याचा दावा जिल्हा क्षयरोग व आरोग्य विभागाने केला आहे. मात्र त्यांचा हा दावा कितपत सत्य आहे, हे त्यांनीच सादर केलेल्या अहवालावरुन सिध्द होते. त्यांनी सादर केलेल्या अहवालात सन २००९ ते डिसेंबर २०१६ या आठ वर्षात जिल्ह्यातील तब्बल ६५८ क्षयरुग्णांना मृत्यूने कवटाळले आहे. तर ९ हजार ९४७ क्षयरुग्ण आढळल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दिवसागणीक क्षयरुग्णांची संख्या कमी होत असली तरी परिस्थिती पुर्णपणे नियंत्रणात आणण्यात जिल्हा क्षयरोग अधिकारी व आरोग्य विभाग अपयशी ठरले आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’ या वचनाप्रमाणे आरोग्य हीच आपली संपत्ती असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. मात्र त्यांनी केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात ते अपयशी ठरल्याने नागरिकांचे जीव अजूनही धोक्यातच आहेत. भंडारा जिल्ह्यात एमडीआर व एक्सडीआर या क्षयरोग आजाराचे रुग्ण आढळून आलेले आहेत. सन २००७ पासून माहे डिसेंबर २०१६ अखेर एमडीआरच्या १३५ रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. त्यापैकी २६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३७ रुग्ण बरे झाले असून १८ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा क्षयरोग कार्यालयाने स्पष्ट केले आहे. एक्सडीआरच्या आठ क्षयरुग्णांचे निदान झाले असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. खासगी दवाखान्यातून औषधोपचार घेत असताना व त्याची नोंद सन २०१६ पासून शासकीय यंत्रणेत करण्यात येत आहे. वरील टक्केवारुन क्षयरुग्ण संख्येत अल्पशा घट झाली आहे. परंतु यापेक्षाही जास्त क्षयरोग रुग्ण समाजात असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याची कबुली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एन. एस. वानखेडे यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)