शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

इमारत पाडण्याच्या परवानगीने दहा दुकानदारांचा संसार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST

येथील मुख्य बाजारात गणेश व्यापारी संकुल आहे. या संकुलात दहा व्यापारी गत चाळीव वर्षांपासून आपला व्यवसाय करीत आहे. परंतु सहा महिन्यापूर्वी इमारतीच्या मालकाने दुकानदारांना कोणतीच पुर्व सूचना न देता इमारत जिर्ण झाल्याचे कारण पुढे केले. नगर परिषदेकडे इमारत पाडण्याची परवानगी मागितली. त्यावर नगर परिषदेने तात्काळ मंजूरी दिली. आता इमारत पाडण्याच्या हालचाली येथे सुरु झाल्या आहेत.

ठळक मुद्देतुमसर नगर परिषद : दुकानदारांनी दिला आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : येथील बोसनगरातील गणेशभवन व्यापारी संकुलाची इमारत पाडण्याची परवानगी नगर परिषदेने दिल्याने दहा दुकानदारांचा संसार उघड्यावर येणार आहे. आता उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न पडलेल्या या दुकानदारांनी मंगळवारी तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देवून आंदोलनाचा इशारा दिला आहे.येथील मुख्य बाजारात गणेश व्यापारी संकुल आहे. या संकुलात दहा व्यापारी गत चाळीव वर्षांपासून आपला व्यवसाय करीत आहे. परंतु सहा महिन्यापूर्वी इमारतीच्या मालकाने दुकानदारांना कोणतीच पुर्व सूचना न देता इमारत जिर्ण झाल्याचे कारण पुढे केले. नगर परिषदेकडे इमारत पाडण्याची परवानगी मागितली. त्यावर नगर परिषदेने तात्काळ मंजूरी दिली. आता इमारत पाडण्याच्या हालचाली येथे सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे या लघु व्यवसायीकांना संकुल मालकाने अद्यापही लेखी सूचना दिली नाही. परंतु इमारत पाडण्याचा घाट घातल्याने एकच खळबळ उडाली. शेवटी या व्यवसायीकांनी गणेश भवन बचाव संघर्ष समिती स्थापन केली. तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन इमारत न पाडण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे.पूर्व सुचना न देता दुमजली इमारत भूईसपाट झाल्यावर आम्ही कुठे जावे असा प्रश्न या व्यवसायीकांनी केला आहे. पर्याय व्यवस्था न होताच इमारतीतून साहित्य कुठे न्यावे असा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे. तात्काळ परवानगी देण्यामागचे कारण काय? असा प्रश्न आहे.इमारतीची विक्री केल्याची शहरात चर्चागणेश भवन इमारतीची विक्री केल्याची शहरभर चर्चा आहे. तुमसर शहरात जुन्या इमारती विकण्याचा गोरखधंदा सुरु आहे. या इमारतीची जागा भाडेतत्वावर असल्याची माहिती दुकानदारांनी दिली. चाळीस वर्षापासून व्यवसाय करणाºयांना येथून कसे बाहेर काढता येते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. इमारत जुनी असल्याचे कारण दिले तरी ते कारण मात्र कुणाला पटण्यासारखे नाही.३० वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेल्या घरमालकांना घर पाडण्याची नोटीस दिली आहे. एकदा दिलेली परवानगी मला थांबविण्याचा अधिकार नाही.- अर्चना मेंढे, मुख्याधिकारीशहरात अनेक जुन्या इमारती आहे. नगर परिषदेचे मुख्य प्रवेशद्वार १०० वर्षापेक्षा जास्त वर्षाचे आहे. ते तुम्ही पाडणार काय? इमारत नियमबाह्यपणे येथे विक्रीची हालचाल आहे. चौकशी न केल्यास आंदोलन करण्यात येईल.- डॉ. चंद्रशेखर भोयर, अध्यक्षगणेश भवन बचाव संघर्ष समिती