शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
3
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
4
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
5
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
6
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
7
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
8
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
9
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
10
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
11
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
12
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
13
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
14
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
15
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
16
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
17
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
18
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
19
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
20
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली

पारा भडकला, नागरिक घामाधूम, उष्णतेच्या लाटेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 14:17 IST

देवानंद नंदेश्वर  भंडारा : सूर्य आग ओकू लागला आहे. सकाळी ९ वाजतापासून नागरिक घामाघूम होत आहे. येत्या काही दिवसांमध्ये ...

देवानंद नंदेश्वर 

भंडारा : सूर्य आग ओकू लागला आहे. सकाळी ९ वाजतापासून नागरिक घामाघूम होत आहे. येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली. सध्या कमाल तापमान ४२ अंश आहे. उष्माघात होऊ नये, यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

हवामान बदलामुळे या वर्षी वातावरणीय बदलाला मोठ्या प्रमाणावर मानव जातीला तोंड द्यावे लागत आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढते आहे. वातावरणाचे तापमान ३० डिग्री सेल्सीअस असते तोपर्यंत मानवाला त्याचा काही त्रास होत नाही, त्यानंतर मात्र मानवी शरीर वातावरणातील उष्मा शोषून घेऊ लागते आणि त्याचे विपरित परिणाम मानवाच्या शरीरावर होऊ लागतात. तापमान आणि आर्द्रता यांचा मिळून होणारा परिणाम अधिक असतो. उष्णतेच्या लाटेमुळे होणारी हानी टाळण्याकरिता हिट ॲक्शन प्लॅन अर्थात उष्ण प्रतिबंधक कृती योजना आखण्यात आलेली आहे.

उष्माघाताची लक्षणे

शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्क होणे, थकवा येणे, १०२ डिग्रीपेक्षा अधिक ताप येणे, त्वचा कोरडी व भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्त्तदाब वाढणे, मानसिक बेचैन, बेशुद्ध अवस्था उलटी, अशी अनेक लक्षणे आहेत.यांना असतो अधिक धोका

वय ५ पेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त, कष्टाची सवय नसणारे लोक, धूम्रपान, मद्यपान करणारे आणि कॉफी पिणारे व्यक्ती, मूत्रपिंड, हृदयरोग, यकृत त्वचा विकार, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी रुग्ण, स्टीमुलटन्स या औषधींचे सेवन सुरू असलेले रुग्ण, जास्त तापमान, वातानुकूलनाचा अभाव, अति आर्द्रता, तंग कपडे, शेतकाम, कारखान्यातील काम, ऊन आणि उष्णतेशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना उष्माघाताची अधिक जोखीम असते.

टॅग्स :bhandara-acभंडारा