शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठा आंदोलक आक्रमक, रस्त्यावर ठिय्या आंदोलन, चक्का जाम
3
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
6
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
7
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
8
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
9
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
10
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
11
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
12
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
13
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
14
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
15
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
16
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
17
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
18
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
19
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
20
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर

तांत्रिक अधिकाऱ्यांकडून रोहयो कामात हयगय

By admin | Updated: May 21, 2015 00:36 IST

शासन जनहितार्थ अनेक कल्याणकारी योजनांची निर्मिती करते पण क्रियान्वयन यंत्रणेतील अधिकारीच स्वार्थासाठी ...

लाखनी : शासन जनहितार्थ अनेक कल्याणकारी योजनांची निर्मिती करते पण क्रियान्वयन यंत्रणेतील अधिकारीच स्वार्थासाठी ग्रामपंचायत समितीवर दबाव आणून शासनाने ठरवून दिलेल्या दिशानिर्देशाला तिलांजली देत असल्याचे प्रकार तालुक्यात घडून येत आहेत.ग्रामपंचायतीच्या नावाने पंचायत समितिच्या मग्रारोहयो विभागातील काही तांत्रिक अधिकाऱ्यांनीच कंत्राटदारीचा गोरखधंदा सुरू केल्याचे निर्देशनास येत आहे. यामुळे अंदाजपत्रकात साहित्याच्या किमती वाढविल्या जात असून त्याचा भार शासकीय तिजोरीवर पडत आहे.ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील गरीब कुटूंबातील एका व्यक्तीस वर्षातून १०० दिवस रोजगार उपलब्ध व्हावा, मजुरांची आर्थिक सबलीकरणासोबत ग्रामीण भागाचा विकास व्हावा, काही अंशी बेरोजगारीवर मात करता यावी, याकरिता केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाद्वारे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेस सुरूवात केली. राज्यात ही योजना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने सुरू आहे. यात ६० टक्के मजुरप्रधान कामे व ४० टक्क्यापेक्षा सिमेंट कांक्रीट रस्ता, नाली, पानवठा, खडीकरण व मुरूम पसरविणे अशा कुशल कामाचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामविकासाचे उद्दिष्ट असल्याने गावाच्या आवश्यकतेनुसार ग्रामसेवकांच्या माध्यमाने मजूर प्रधान कामे सुचविण्याचे अधिकार ग्रामपंचायतीस दिलेले आहेत.ग्रामपंचायतीनी सुचविलेल्या अकुशल व कुशल कामाचे तालुकास्तरीय नियोजन करणे कामाचे अंदाजपत्रक तयार करणे व मंजुर कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज खंडविकास अधिकाऱ्यांना उपलब्ध दस्तऐवज खंडविकास अधिकाऱ्यांना उपलब्ध करणे, मजुरांचे हजेरीपत्रक व झालेल्या कामाचे मोजमाप करून मजुर पगार काढण्यासाठी पंचायत समितीचे अधिनस्त स्वतंत्र महाराष्ट्र रोजगार हमी योजना विभागाची स्थापना करण्यासाठी कंत्राटी तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य मानधनावर ते सेवा देत असतात. खरीप व रब्बी हंगाम संपल्यानंतर मग्रारोहयोची अकुशल कामांना सुरूवात केली जाते. तालुक्याचा संपूर्ण कामांचा रेकॉर्ड या कंत्राटी तांत्रिक अधिकाऱ्याकडे असल्याने कोणत्या ग्रामपंचायतीत अकुशल कामे पूर्ण झाली आहेत. याची माहिती असते.मजुरप्रधान कामे पूर्ण झालेल्या गावातील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच व सदस्यांशी स्वत: किंवा आपल्या हस्तकामार्फत संपर्क साधून तांत्रिक अधिकारी ठरावाची मागणी करतात. अंदाजपत्रक तयार करताना तांत्रिक अधिकारी शासनाचे नियम पायदळी तुडवून स्वत:चे स्वार्थ जोपासण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. कंत्राटी तांत्रिक अधिकाऱ्यावर वचक निर्माण होणे आवश्यक आहे. (तालुका प्रतिनिधी)ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांच्या सहकार्याने एमआरईजीएसचे कामे नियमानुसार पूर्ण केली जातात.- हेमंत मेहर, संवर्ग विकास अधिकारी लाखनी.