शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

टेक एक्स्पोचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 22:30 IST

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे भंडारा पोलीस विभागाच्या वतीने टेक्स एक्स्पो २०१८ या कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले.

आॅनलाईन लोकमतभंडारा : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे भंडारा पोलीस विभागाच्या वतीने टेक्स एक्स्पो २०१८ या कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले.कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक विनिता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर, पोलीस उपअधिक्षक गृह कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले उपस्थित होते. यावेळी विनिता साहू यांनी, सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच शाळकरी व महाविद्यालयीन मुले, महिला व बाल विकास अधिकारी, विधी सेवा प्राधिकरण, फॉरेन्सीक सायन्स या सर्वांनी अगदी कमी वेळात चांगली मेहनत घेवून कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मोलाची भूमिका पार पाडली आहे. आमचा जो उद्देश होता तो परिपूर्ण झालेला आहे. तसेच पोलिसांची कामगिरी व भूमिकेबद्दल माहिती सांगितली. पोलिसांबद्दलचे गैरसमज दूर व्हावे, मनातील भिती जावी, हा या मागचा उद्देश आहे. समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता पोलीस कार्य करतात. चारही विभागांतर्गत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिरते पोलीस स्टेशन घेण्यात येत आहे. मुलामुलीचे घरातून पळून जावून लग्न करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. मुले मुलींना पळवून नेतात. त्यामुळे त्यांचे विरूद्ध अपराधाचे गुन्हे दाखल होवून त्यांचे उज्वल भविष्य धोक्यात येते, याबाबत माहिती दिली.समारोप कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, भंडारा यांना प्रथम पारितोषिक, प्रिव्हीयन्स फॉरेन्सिक टेक्नालॉजी, नागपूर यांना द्वितीय पारितोषिक आणि फॉरेन्सीक इन्स्टीट्यूट कॉलेज नागपूर यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले. त्याचप्रमाणे भंडारा पोलीस विभागातील फिरते पोलीस स्टेशनला प्रथम पारितोषिक, आॅनलाईन तक्रार सुविधा यांना द्वितीय पोरितोषिक आणि अ‍ॅन्टी नक्षल सेल यांना तृतीय पारितोषिक देवून गौरविण्यात आले.