शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी संस्कारक्षम विद्यार्थी घडवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:17 IST

मुली स्पर्धेत टिकायला हव्यात व अशी संस्कारक्षम आणि कर्तव्यदक्ष विद्यार्थिंनी घडविणारी नूतन कन्या एक पथदर्शी शाळा आहे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मेंढेकर यांनी केले.

ठळक मुद्देदत्तात्रय मेंढेकर : नूतन शाळेचा वार्षिक स्नेहसंम्मेलन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुली स्पर्धेत टिकायला हव्यात व अशी संस्कारक्षम आणि कर्तव्यदक्ष विद्यार्थिंनी घडविणारी नूतन कन्या एक पथदर्शी शाळा आहे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मेंढेकर यांनी केले.स्थानिक नूतन कन्या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या दुसºया दिवशी ते बोलत होते. समाजाला सर्व क्षेत्राची गरज असते. असे गुणवत्तापूर्ण व अष्टपैलू शिक्षण देणारी नूतन कन्या ‘ मदर स्कूल’ आहे असेही वक्तव्य त्यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मेंढेकर तर प्रमुख अतिथि म्हणून समीर गंगाखेडकर, डॉ. प्राजक्ता गंगाखेडकर, न्यू गर्ल्स स्कूल संस्थेचे अध्यक्ष मनोहरराव बोंगीरवार, अ‍ॅड़ एम. एल. भूरे तसेच प्राचार्य नंदा नासरे मुख्याध्यापिका वर्षा देशपांडे, धास्कट आदि उपस्थीत होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नंदा नासरे यांनी केले. नेतृत्व करणारा ‘ग्लोबल केझीन’ व माणुसपणं जणपारी कर्तव्यदक्ष पिढी शाळेतून घडविण्याचा मानस त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनी व राज्यस्तरीय खेळाडूंचा सन्मानचिन्ह देवून सत्कार व गुणगौरव करण्यात आला. १२५ वर्षांचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांना दाखविणाºया शाळेच्या व्यवस्थापन मंडळाचे कार्य अप्रूप आहे असे मत कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथि डॉ. गंगाखेडकर यांनी व्यक्त केले. स्वप्न पहाणे व पूर्ण करण्यास जी शाळा शिकविते त्या शाळेचा सार्थ अभिमान असावा. सद्विचारांचा धागा विद्यार्थ्यांनी आयुष्यभर जपूण स्वत:चे नावलौकिक वाढवितांना स्वाभिमान व अभिमान बाळगावा असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी एन.सी.सी. कॅडेट्सनी सैनिकांची कर्तव्यदक्षता व जीवनपट सादर करणारी एक भावनिक नाटिका सादर केली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि व मार्गदर्शक समीर गंगाखेडकर यांनी विद्यार्थिनींना २१ व्या शतकातील आव्हाने व त्यावर विचारमंथन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. भूदल, नौदल, व वायुदल या क्षेत्रातील मुलींसाठी संधीचा विद्यार्थिनींना पॉवर पॉईट प्रेझेंनटेशनद्वारे परिचय करुन दिला.