साकोली : तालुक्यातील विर्शी येथील जीएसई हायस्कूलमध्ये तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष जयाताई भुरे, शैलेश गजभिये, अनिल टेंभरे, उपसरपंच नंदलाल राऊत, ग्रा.पं. सदस्य रजनी राऊत, प्रफुल्लताताई कोटांगले, बापूदास पंधरे, वंदनाताई लोधीकर आदी उपस्थित होते. सत्कारमूर्ती म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका बी.एस. शिवरकर, एम.झेड. बोरकर, रामटेके, गुरबेले, प्रमोद लंजे, भोजेंद्र गहाने, लंजे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ब्राह्मणकर, कामथे, राजू टेंभुर्णे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात नवनियुक्त ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी पुरुषोत्तम भुरे, मुकेश लांजेवार, शांताबाई राऊत, शीलाबाई लोधीकर, अनिता कोवे, प्रतिमा वाघाडे, सुनीताताई कापगते, सत्यफुलाताई सिडाम, वंदना सयाम, शोभा भुरे, शारदा इलमकार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अनिल टेंभरे, संचालन प्रमोद लंजे यांनी, तर आभार राजू टेंभुर्णे यांनी मानले.
विर्शी येथे शिक्षकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:41 IST