भंडारा : शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात नागपूर विभाग शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था चंद्रपूरतर्फे सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी तसेच आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाच्या विचार मंचावर अध्यक्षस्थानी गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू कीर्तीवर्धन दीक्षित होते.
दीक्षित म्हणाले, कोणत्याही संस्थेची प्रगती ही त्या संस्थेच्या नेतृत्वात असणारी दूरदृष्टी, संयमीवृत्ती, संस्थेवरील नियंत्रण आणि सर्वसामान्यांचा संस्थेवर असणारा विश्वास यावर अवलंबून असतो. या पतसंस्थेचे नेतृत्व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकरराव अडबाले यांच्याकडे आहे. नागपूर विभागातील खासगी, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक न्याय विभागाच्या शाळा, दिव्यांग शाळा, नगरपालिका, महानगरपालिका, आश्रमशाळा इत्यादी शाळेतील कार्यरत शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा त्यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास आहे. त्यामुळेच अल्पावधीत ही शिक्षक, शिक्षकेतर संस्था नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांत पोहोचली असून, यात सुधाकर अडबाले यांची शिक्षकांप्रती असलेली तळमळ दिसून येते.
यावेळी विचार मंचावर प्राचार्य अनिल शिंदे, विजुक्टाचे माजी अध्यक्ष प्रा. अशोक फोपळे, प्राचार्य स्मिताताई ठाकरे, प्राचार्य आस्तिक उरकुडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा विमाशी संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, सहकार प्रशिक्षण केंद्राचे माजी प्राचार्य काकडे, उपप्राचार्य देवगडे सर्व संचालक मंडळ प्रामुख्याने उपस्थित होते. संचलन सुरेंद्र अडबाले व मनीष कन्नमवार यांनी तर आभार संजय ठावरी यांनी केले. समारंभासाठी दिलीपराव मोरे, अशोक वरभे, अशोक बोढे, विनोद रणदिवे, सुनील शेरकी, शरद डांगे, दिनकर अडबाले, प्रा. ज्ञानेश्वर सोनकुसरे, प्रकाश अडबाले, प्रदीप वासेकर, प्रशांत अडबाले, अनिल नांदे, नकुल नामपल्लीवार, अमित पोतराजे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.