शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दळणासाठी करदात्यांना आता मोजावे लागणार नाही पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 05:00 IST

३१ मार्च २०२१ पूर्वी जे कुटुंब संपूर्ण करमुक्त होतील त्यांना वर्षभर ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोफत दळण करून मिळेल असा उपक्रम सरपंच सदाशिव ढेंगे यांनी हाती घेतला होता. यावर विश्वास ठेवून २५२ कुटुंबानी संपूर्ण कर भरला. करातून हरदोली /झंझाड ग्रामपंचायतच्या कोषात ६ लक्ष २७ हजार ६९२ रुपये ३१ मार्चपर्यंत जमा झाले. करमुक्त दात्यांना मोफत दळण लाभ देणाऱ्या  योजनेचा करण्यात आला.

ठळक मुद्देमहिलेच्या हस्ते लोकार्पण : हरदोली ग्रामपंचायतचा उपक्रम

लाेकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : करमुक्त असणाऱ्या कुटुंबाला दळणासाठी वर्षभर एकही रुपया खर्च करावा लागणार नाही, असा अभिनव प्रयोग ग्रामपंचायत हरदोली झंझाड येथील प्रशासनाने वास्तवात आणला. करदात्यांना मोफत दळण यंत्राचे लोकार्पण करण्यात आले. असा हा अभिनव उपक्रम राबविणारी कदाचित जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत असली पाहिजे.   वटसावित्रीच्या सणाचे औचित्य साधून ज्योती भोयर या महिलेच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मोहाडी तालुका अध्यक्ष राजेश हटवार, शिवसेना तालुका अध्यक्ष अनिल सार्वे, राष्ट्रवादी पक्ष तालुका महासचिव विजय पारधी,  कांद्री वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, युवती कॉंग्रेस अध्यक्ष तारा हेडाऊ, राजेंद्र मेहर, माजी पं.स. सदस्य केशव बांते, प्रदीप बुराडे, पंढरीनाथ झंझाड, रवींद्र झंझाड, महादेव पाचघरे, डॉ. हिमांशु मते, मुरलीधर झंझाड, प्रदीप बुराडे, ग्रामसचिव गोपाल बुरडे आदी उपस्थित होते.३१ मार्च २०२१ पूर्वी जे कुटुंब संपूर्ण करमुक्त होतील त्यांना वर्षभर ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोफत दळण करून मिळेल असा उपक्रम सरपंच सदाशिव ढेंगे यांनी हाती घेतला होता. यावर विश्वास ठेवून २५२ कुटुंबानी संपूर्ण कर भरला. करातून हरदोली /झंझाड ग्रामपंचायतच्या कोषात ६ लक्ष २७ हजार ६९२ रुपये ३१ मार्चपर्यंत जमा झाले. करमुक्त दात्यांना मोफत दळण लाभ देणाऱ्या  योजनेचा करण्यात आला. दळण यंत्राद्वारे सर्वप्रथम दळण करून घेण्याचा  व  या योजनेत पहिला लाभार्थी होण्याचा सन्मान ज्योती भोयर         या महिलेला मिळाला आहे.  ग्रामीण जनता मात्र इमारत कर, पाणीपट्टी कर, दिवाबत्ती कर, स्वच्छता कर सामान्य आरोग्य आदी कर भरण्यास बेफिकिरी दाखवतात. हरदोली ग्रामपंचायत अंतर्गत ६३२ करदाते आहेत. त्यापैकी ३१ मार्चपूर्वी  २५२ करदात्यांनी कर भरला आहे. वर्षभर दळण मोफत ही योजना सुरू झाल्यानंतर कर भरण्यास वेग येणार आहे. असा प्रयोग करणारी हरदोली ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. डिसेंबरच्या ग्रामपंचायतीने मासिक सभेत एकमताने पारित केला आहे. मोफत दळण योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतीने शर्थी लागू केल्या आहेत. १४ लाख ३४ हजार ७६२ रुपयांची मागणी आहे. दहा लाख ७१ हजार ४२० रुपयांची थकबाकी आहे. ग्रामपंचायतने  आतापर्यंत केवळ ६ लाख २७ हजार ६९२ रुपयांचा कर वसूल केला. कर भरा, दळण मोफत करा, ही योजना सुरू केली आहे. ३१ मार्चपर्यंत जे कुटुंब  कर भरू शकले नाही, अशा कुटुंबांनी एक महिन्याच्या आत कर भरला तर त्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.  २०२१-२२ या वित्तीय वर्षात एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण कर भरतील, त्यांना वर्षभर गहू, तांदूळ, डाळीचे दळण सोमवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार या दिवशी मोफत करून मिळणार आहे. यासाठी २५२ करदात्यांना ओळखपत्र दिले गेले आहे. त्यात कुटुंबातील सदस्यांची नावे राहणार आहेत. करदात्यांना कर भरण्याची प्रेरणा मिळणार आहे. या गावाला अलीकडेच १० लक्ष रुपयाचा स्मार्ट गाव   पुरस्कार प्राप्त झाला आहे. कार्यक्रमाला संगीता झंझाड, प्रेमलता झंझाड, भिवाजी गायधणे, विलास झंझाड, स्वप्निल माटे, पंढरीनाथ तांदुळकर, पेंदाम मॅडम, शीलाताई झंझाड, अंजना तांदुळकर, पंचफुला परसमोडे, दिगंबर झंझाड, यशवंत थोटे, प्रवीण तांडेकर, अभिजित पंकज झंझाड घोरमारे, आकाश बुरडे, विजय झंझाड, दिलदार गजभिये, प्रफुल धुमनखेडे, धार्मिक गुरुजी, विकास बुरडे,यांची उपस्थिती होती. 

गावात थकीत करांचा आकडा वाढत आहे. त्याचा परिणाम गाव विकासावर होत आहे. कर बुडवेगिरीला लगाम लावला जावा. करदात्यांना करप्रणालीमध्ये नियमित करावे. ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी हा नवीन प्रयोग राबवला जात आहे.-सदाशिव ढेंगे, सरपंच, ग्रामपंचायत हरदोली (झंझाड)

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतTaxकर