शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तथागत बुद्धांचा धम्म हा जगाला तारणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:00 IST

प्रज्ञा म्हणजे ज्ञान, असे ज्यातून दु:खाच्या कारणाचा बोध होतो. दु:खाचे कारण दुर केले की दु:ख दुर होते. माझ्या दु:खाला मीच जबाबदार आहे. मीच ते निर्माण केले आहे आणि मलाच ते दुर करावे लागेल. याचा बोध त्याला होतो. बुध्दांनी पंचशिल दिलेले आहे, त्याचे पालन करावे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : आलेबेदर येथे बुद्ध-भीमगीतांचा जलसा कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतसाकोली : प्रज्ञा म्हणजे ज्ञान, असे ज्यातून दु:खाच्या कारणाचा बोध होतो. दु:खाचे कारण दुर केले की दु:ख दुर होते. माझ्या दु:खाला मीच जबाबदार आहे. मीच ते निर्माण केले आहे आणि मलाच ते दुर करावे लागेल. याचा बोध त्याला होतो. बुध्दांनी पंचशिल दिलेले आहे, त्याचे पालन करावे. तथागत बुद्धांचा धम्म हा जगाला तारणारा आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. आलेबेदर येथे आयोजित बुध्द भिमगीतांचा जलसा कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी साकोलीच्या नगराध्यक्ष धनवंता राऊत या होत्या. अतिथी म्हणून महाराष्टÑ शासन पुरस्कार प्राप्त डी.जी. रंगारी, राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुध्द शेवाळे, पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार, सुभाष कोइारे, मनोज कोटांगले, भावेश कोटांगले, संचालक रोशन बडोले, प्राचार्य डी. जी. मळामे, डॉ. अजय अंबादे, दिपक मेश्राम, गायक सुर्यकांता पाटील आदी मंचावर उपस्थित होते.ना. बडोले म्हणाले, शील म्हणजे नियम, समाजात कसे वागावे याचे नियम समाजामध्ये अशी व्यवस्था निर्माण व्हावी जिचा मुळाधार हा न्याय, समता, व्यक्तीस्वातंत्र्य आणि समान संधी हा असेल. शिलपालनाचा आणि मनाचा खुप जवळचा संबंध आहे. कारण मनावर ताबा असला तरच शिल पाळता येते. एखाद्या व्यसनातुन बाहेर पडावे, असे त्याला वाटत असते पण मनावर ताबा नसल्यामुळे तो परत परत त्या चक्रात अडकला जातो. मनावर संयम मिळविण्याकरिता गौतम बुध्दाने समाधीचा पुरस्कार केला अशी समाधी शिकविली. जीचा मुळाधार निसर्गनियम आहे. श्वास आणि संवेदनावर आधारित साधना शिकविली. जी साधना कोणताही माणुस सहन करु शकतो. त्यातुन मन एकाग्र होते आणि मनावर ताबा येतो.डी. जी. रंगारी यांनी प्रास्ताविकातून, आलेबेदर येथील त्रिरत्न बौध्दविहार येथे वर्षभर कसे विविध उपक्रम राबविले जातात व माणुस बनविण्याचा ठिकाण आलेबेदर आहे. येथुनच धम्मज्ञान उपासक घेऊन जातात असे सांगितले. त्यानंतर सर्वच गायकांनी भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर संगीतातून प्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन शीलकुमार वैद्य यानी तर आभार कव्वाल मनोज कोटागले यांनी केले.ना. राजकुमार बडोले यांनी पण आपल्या धम्मभूमीत एक तास बसुन गीत ऐकले. या भिमजलस संगिताच्या कार्यक्रमाला अलोट गर्दी झालेली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भिक्खु संघज्योती, भिक्खु जीवन ज्योती, भिक्खु नागसेन, भिक्खु आनंद, भिक्खु विनय ज्योती, भिक्खु बोधीपालो, भिक्खु विपस्सी, भिक्खु मेत्तासेन, श्रामणेर विद्यानंद, पिदक मेश्राम, डी. जी. रंगारी, कल्पना सांगोडे, अर्चना रामटेके, प्रज्ञा दिरबुडे, सुमित संबोधी, मनोज कोटांगले व सर्व समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला हे विशेष.