भंडारा : मोहाडी तालुक्यातील वासेरा येथील प्रेमीयुगुलाचा विवाह महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या वतीने लावून देण्यात आला. विवाहाकरीता आवश्यक ते सोपस्कार पार पाडून पदाधिकाऱ्यांनी प्रेमीयुगुलास विवाह बंधनात बांधले.वासेरा येथील रामेश्वर राधेश्याम पिंगरे (२२) आणि हिवरा येथील प्रमिला शिवा भोयर (१९) यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. दोघांचीही लग्नाची तयारी असली तरी कुटुंबातून विरोध होता. या प्रेमीयुगुलाने वासेरा येथील तंटामुक्त गाव समितीकडे अर्ज सादर करीत विवाह लावून देण्याची मागणी केली होती. समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी त्यांच्या अर्जावर विचार करीत कागदपत्रे तपासून या पे्रमीयुगुलाचे शुभमंगल उरकविले. यावेळी समितीचे अध्यक्ष विजय झंजाळ, निमंत्रक खेमराज तडस, सरपंच मंदा झंजाळ, उपसरपंच जारचंद पिंगळे, हिवरा येथील उपसरपंच चंद्रशेखर चवळे, राजेंद्र चवळे, रामप्रसाद झंजाळ, दामोधर नेवारे व ग्रामस्थ उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
तंटामुक्त समितीने लावला प्रेमीयुगुलाचा विवाह
By admin | Updated: August 4, 2015 00:30 IST