शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

एक हजाराच्या लाचेसाठी तलाठी अडकला जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 13:50 IST

Bhandara : शेतीच्या फेरफारसाठी मागितली होती रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरेदी केलेल्या शेतीची रजिस्ट्री झाल्यावर फेरफार करण्यासाठी निव्वळ एक हजार रुपयांची लाच स्वीकारणे पवनी तालुक्यातील तलाठ्याच्या अंगलट आले. तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरून लाच स्वीकारतानाच तलाठी अलगद सापळ्यात अडकला. ही कारवाई बुधवारी रात्री ९:४५ वाजता नागपूर नाक्यावर पार पडली. रवींद्र सुभाष पडोळे (३७) असे या तलाठ्याचे नाव आहे.

पोलिस सूत्रांनी माहितीनुसार, या तक्रारकर्त्याने नेरला (ता. शेती खरेदी केली होती. रजिस्ट्री ७ मे रोजी केलेल्या शेतीचे करण्याकरिता संबंधित रोजी नेरलाचा तलाठी घटनेतील पवनी) येथे त्या शेतीची झाली. खरेदी फेरफार व्यक्तीने ७ मे रवींद्र पडोळे याची भेट घेऊन कागदपत्रे सोपविली. मात्र ११ मे रोजी तलाठ्याने संबंधित व्यक्तीला फोन करून कामासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र ही रक्कम द्यायची नसल्याने संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचून १५ मे रोजी रक्कम देण्याचे ठरले. दरम्यान, एवढी रक्कम शक्य नसल्याचे सांगत तडजोड एक हजार रुपयांपर्यंत केली. ठरल्यानुसार, बुधवारी रात्री साडेनऊ वाजता तलाठ्याला रक्कम घेण्यासाठी नागपूर नाक्यावर बोलावले. अगदी चौकातच ही एक हजार दिलेल्या ही रुपयांची रक्कम स्वीकारत असताना सापळा रचून असलेल्या पथकाने ९:४५ वाजता त्याला नोटांसह रंगेहात अटक केली. 

विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली उप.अधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या पुढाकारात पोलिस निरीक्षक अमित डहारे यांनी ही कारवाई केली. या पथकात पोलिस नाईक अतुल मेश्राम, अंकुश गाढवे, शिपाई चेतन पोटे, मयूर सिंगनजुडे, राजकुमार लेंडे, चालक राहुल राऊत सहभागी होते.

पहाटेपर्यंत चालली कारवाईअटकेनंतर तलाठी रवींद्र पडोळे याला अटक करून लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. ही कारवाई पहाटे ४ वाजेपर्यंत चालली. गुरुवारी दुपारनंतर त्याला न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. 

 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारbhandara-acभंडारा