शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी कार्यालय भाड्याच्या घरात

By admin | Updated: May 22, 2014 00:54 IST

भंडारा जिल्ह्यातील बहुतांश तलाठी क ार्यालय हे भाड्याच्या घरात आहेत.

मोहाडी : भंडारा जिल्ह्यातील बहुतांश तलाठी क ार्यालय हे भाड्याच्या घरात आहेत. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

शासनाला लाखो रुपयांचा महसूल गोळा करून देणारे कार्यालय म्हणून तलाठी कार्यालय मोलाची मदत करीत असते. मात्र याच तलाठी कार्यालयांची दैनावस्था झालेली आहे. बहुतांश तलाठी कार्यालये हे भाड्याच्या घरात चालत आहेत. शासन अनेक योजना राबवते.

त्यामध्ये घरकूल योजना, इंदिरा आवास योजना यासह अनेक प्रकारच्या योजना राबवून अनेक बेघरांना व गरजू व्यक्तींना पाहण्यासाठी घर उपलब्ध करून देते. मात्र शासनाच्या अशा कार्यालयाकरिता शासनाची झोळी रिकामी असते. तलाठी कार्यालय हे शेतकर्‍यांया मदतीचे एक मुख्य केंद्र आहे.

या कार्यालयाद्वारे शेतकर्‍यांना सातबारा, गाव नमुना आठ, उत्पन्नाचे दाखले, जमिनीचे मोजमाप तसेच दुष्काळ, अतवृष्टीने बाधित झालेल्या शेताची, घरांची नोंद घेऊन त्यांचे नुकसान शासनापर्यंंत पोहोचविण्याचा प्रथम कर्तव्य हे तलाठीच करतात. असे एक ना अनेक कामे हे तलाठी कार्यालयामार्फत केले जातात.

मात्र त्या मानाने या कार्यालयामध्ये सोयी सुविधांचा अभाव दिसून येतो. शासनातर्फे या कार्यालयाचा कधी विचारच केला जात नाही. शासनाजवळ प्रत्येक गावात स्वत:चे भूखंड आहेत. या कार्यालयातर्फे कितीतरी महसूल गोळा केल जातो. तरी या भूखंडावर तलाठी कार्यालय बचविण्यासाठी प्रयत्न केले जात नाही.

उलट इतर लोक शासकीय जागेवर अतिक्रमण करून पक्के घर बांधून घेतात. शासनाजवळ जागा व पैसा असताना हे कार्यालय बांधण्याची मानसिकता नसणे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

एक टेबल, एक खुर्ची

शेतकर्‍यांच्या नेहमी कामे पडणारा तलाठी कार्यालय शासनाच्या दुर्लक्षामुळे भकास स्वरुपात आढळतो. अनेक तलाठी कार्यालयात एक टेबल, एक खुर्ची, एक आलमारी असे स्वरुप असते. येणार्‍या शेतकर्‍यांना बसण्यासाठीही खुर्ची मिळत नाही. कदाचित हे कार्यालय सर्वाधिक शेतकर्‍यांशी निगडित असल्यानेच याची अशी स्थिती असावी. (शहर प्रतिनिधी)