शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा आला, विजांपासून वाचण्यासाठी खबरदारी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 13:14 IST

Bhandara : जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळा तोंडावर आला आहे. जून महिन्यात मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस असतो. या काळात मोठ्या प्रमाणात वादळीवाऱ्यासह विजांचा कडकडाट पाहायला मिळतो, अशात विजा पडण्याच्या घटनाही घड्डू शकतात. यातून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होते. या पृष्ठभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून करण्यात आले आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात वळीवाचा पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटासह वळीवाचा पाऊस हजेरी लावत आहे. या वळीवाच्या पावसाच्या कालावधीत अनेक ठिकाणी वीज पडून जनावरे आणि माणसांचाही मृत्यू होण्याच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे.

विजा चमकत असल्यास काय करू नये?• शेतात जर ओलसरपणा असेल, तर अशा ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींनी थांबू नये.• जंगलात तुम्ही आधीच खोलगट भागामध्ये असाल, तर वरती येण्याचा प्रयत्न करू नका.• चारचाकी वाहनातून प्रवास करीत असाल, तर विजा चमकत असताना वाहनाबाहेर येऊ नका.• विजा चमकत असताना खुल्या मैदानामध्ये उभे राहणे टाळा.• चुकूनही उंच झाडाचा आसरा घेऊ नका.• विजेचा किंवा टेलिफोनचा खांब, तसेच टॉवर इत्यादी जवळ उभे राहू नका.• शेत तसेच बाग, घराभोवती तारेचे कुंपण घालू नका, कारण ते विजेला आकर्षित करते.• महत्त्वाचे म्हणजे एका वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नका. दोन व्यक्तींमध्ये किमान १५ फुटांचे अंतर ठेवा.• धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर टाळा.• पाण्याचा नळ तसेच फ्रिज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका. आकाशात विजा चमकत असताना, चुकूनही मोबाइलचा वापर करू नका.

आकाशात विजा कडाडताना काय कराल?• शेतात असताना आकाशात वीज कडाडू लागल्यास त्वरित शेतामधील शेड किंवा घराचा आसरा घ्या. • पायाखाली प्लास्टिक किंवा गोणपाट, कोरडे लाकूड किवा कोरडा पाला पाचोळा ठेवा.• दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळ पायावर बसा. • पोहणारे किवा मासेमारांनी पाण्यातून बाहेर यावे व सुरक्षित आसरा घ्यावा.• आजूबाजूला एखादे झाड असेल, तर त्या झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे.• उंच झाडाच्या फांदीवर तांब्याची एक तार बांधा व तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवा.• पक्क्या घरावर शक्य असल्यास वीज वाहक यंत्रणा बसवून घ्या.• जंगलात असताना झाडांचा आधार घ्यावा लागल्यास कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्या.• दुचाकी किवा सायकल, ट्रॅक्टर इत्यादी वाहनांवर असाल, तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा.

 

टॅग्स :farmingशेतीbhandara-acभंडारा