शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
3
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
4
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
5
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
6
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
7
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
8
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
9
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
10
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
11
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
12
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
13
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
14
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
15
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
16
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
17
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
18
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
19
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
20
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी

सदोष कृषी केंद्रावर कडक कारवाई करा

By admin | Updated: June 10, 2016 00:56 IST

बोगस व निकृष्ठ बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी तालुकास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या भरारी

जिल्हाधिकारी यांचे निर्देश : तपासणी पथकात दोन शेतकऱ्यांचा समावेश भंडारा : बोगस व निकृष्ठ बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी तालुकास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाने नियमानुसार व काटेकोरपणे तपासणी करावी. तसेच या तपासणीमध्ये दोन शेतकऱ्यांना साक्षीदार म्हणून समाविष्ट करण्यात यावे. दोषी आढळणाऱ्या कृषी केंद्रावर कडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले आहेत.कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. नलिनी भोयर, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा कृषि विस्तार अधिकारी एस.एस. किरवे तसेच सर्व पंचायत समिती कृषि विस्तार अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात एकूण ४८२ कृषि केंद्र, ६८६ खत केंद्र आणि ४३२ दुकानांमध्ये किटकनाशके विक्रीसाठी ठेवण्यात येतात. यापैकी १९० कृषि केंद्र, २०९ खते आणि १२७ किटकनाशकांच्या दुकानांची भरारी पथकाने तपासणी केली. यामध्ये ६ दुकानांचे परवाने रद्द करण्याची शिफारस केली असून १२ दुकानांना दोषी आढळलेले बियाणे व खते विक्री बंद करण्यास नोटीस दिली आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात धान लागवडीसाठी ३३ हजार २०० क्विंटल बियाण्यांची मागणी केली असून त्यापैकी १८ हजार ६७७ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. तसेच तुर ६५० क्विंटल मागणी आणि सोयाबिन ३८०० क्विंटलची मागणी आहे.त्याचबरोबर ८९ हजार ८३५ मेट्रीक टन खताची मागणी असून त्यापैकी ७४ हजार ४०० मेट्रीक टन मंजूर असून १६ हजार ८०६ मेट्रीक टन साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात ५० टक्के मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप झाले आहे. मृद आरोग्य पत्रिकेनुसारच शेतकऱ्यांनी खतांचा वापर करावा आणि दुकानदारांनी तीच खते शेतकऱ्यांना विकावित. त्यांच्या फायद्यासाठी कोणतीही खते शेतकऱ्यांना विकू नयेत. तसेच खतांचे लिंकींग करु नये, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना दिलेत. खत व बियाण्यांचे घोषित केलेले कंपनीनिहाय दर शेतकऱ्यांना कळवावेत. त्यासाठी कृषी केंद्रावर त्याची माहिती उपलब्ध असावी. स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण केंद्राची माहिती सर्व लोकप्रतिनिधींना द्यावी. तसेच तक्रार निवारण केंद्राचा टोल फ्री क्रमांक सर्व शेतकऱ्यांना एस.एम.एस.द्वारे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कळवावा, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. (नगर प्रतिनिधी)