शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दादा, ताई सायकल घे. पण शाळेत ये!

By admin | Updated: May 22, 2014 00:52 IST

सध्या सर्वत्र शाळांमध्ये विद्यार्थी भरती प्रक्रिया सुरू आहे. याबाबद रोजच चर्चा होतात.

सध्या सर्वत्र शाळांमध्ये विद्यार्थी भरती प्रक्रिया सुरू आहे. याबाबद रोजच चर्चा होतात. गुरुजींची विद्यार्थ्यांसाठी पायपीट, भटकंतीे असे शब्द रोजच कानी पडतात. मात्र यात विशेष म्हणजे आपल्या शाळेची विद्यार्थ्यांअभावी तुकडी तुटू नये आणि शाळेचे नाव बदनाम होऊ नये, यासाठी गुरुजी तन-मन-धनाने कामाला लागले आहेत. जिल्हय़ातील बहुतेक भागात विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शाळेत येण्यासाठी विविध अटी घातल्या आणि या अटी गुरुजी मागचा पुढचा विचार न करता पूर्ण करीत आहेत. यासाठी गुरुजींनी अर्थात शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी सायकल देण्याचे ठरविले आणि गुरुजी विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन म्हणताहेत, दादा, ताई सायकल घे, पण आमच्याच शाळेत ये.

विविध शाळांमध्ये विद्यार्थी भरतीसाठी स्पर्धा सुरू आहे. एका शाळेनी सायकल दिली तर दुसर्‍याही शाळेला सायकल देण्याचा उपक्रम करावा लागत आहे. यासाठी शाळेतील शिक्षक आपल्या पगाराचा काही भाग खर्च करत असल्याची माहिती आहे. खाजगी किंवा जिल्हा परिषदच्या शाळा असोत हा प्रकार आता काही नवीन नाही. एका सायकल व्यावसायीकाची भेट घेऊन विचारणा केली असता मे-जून च्या महिन्यात सायकलची विक्रमी मागणी होते आणि ती विविध शाळांच्या माध्यमातून करण्यात येते असे त्यांनी सांगितले. एका सायकलचा विचार करता अडीच ते तीन हजार चा खर्च शिक्षक एका विद्यार्थ्यांमागे करीत आहेत. यासाठी महिन्याच्या पगाराचा काही हिस्सा विद्यार्थी भरतीप्रक्रियेसाठी खर्च करण्यात येत आहे.

शाळा प्रशासन गावागावात विद्यार्थ्यांच्या भेटी घेताना विद्यार्थ्यांंना आम्ही तुला कपडे देऊ, पुस्तक देऊ, जाण्यायेण्यासाठी सायकल देऊ आणि एवढंच नाही तर १0 वी, १२ व्या वर्गात पास करण्याची हमी देतानाचे चित्र आहे. यावरुन शैक्षणिक विकास ग्रामीण व शहरी भागात कितपत साधता येईल हा प्रश्न आहे.

स्पर्धेच्या युगात आकर्षक शाळा, उपक्रमशील शैक्षणिक वातावरण इत्यादी बाबी शोधून पालक आपल्या पाल्याना शाळेत पाठवताना दिसतात आणि या स्पर्धेत बोटावर मोजण्याइतपत शाळा आहेत. ग्रामीण भागातील परिस्थिती फार गंभीर आहे. सायकल, पैसा, कपडे यापेक्षा शिक्षण महत्वाचे आहे हे अजून कित्येक विद्यार्थी आणि पालकांना कळलेच नाही.

ज्या शाळेनी विविध स्कीम दिल्या तुमच्याकडे विद्यार्थी पाठवतो तुम्ही कोणती स्कीम देता असा स्कीमचा खेळ शिक्षणाचा खेळखंडोबा करीतअ आहे. अनेक शाळांचे शिक्षक वैतागले असून नोकरी वाचविण्यासाठी आता सर्वकाही असा नारा देताना दिसत आहेत. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन ताई-दादा म्हणत मनधरणी तर सुरूच आहे. पण वेळ आली तर विद्यार्थ्यांंचे पाय धरण्याची वेळ आली तर तेही करावच लागेल अशी परिस्थिती आहे.