शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातून धान्य न्या, छत्तीसगडमधून रेती आणा ! रेती तस्करांचा नवा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 14:44 IST

Bhandara : ट्रेलरमधून व्हायची वाहतूक; छत्तीसगडच्या नक्षल क्षेत्रातून आली रेती

गोपालकृष्ण मांडवकर लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : महाराष्ट्रातून छत्तीसगड राज्यात ट्रेलरमधून धान्य न्यायचे, आणि त्या रिकाम्या ट्रेलरमधून चोरीची रेती महाराष्ट्राच्या सीमेत आणून विल्हेवाट लावण्याचा प्रकार भंडारा पोलिसांच्या नाकाबंदीत उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रेलरसह १० ब्रास रेती जप्त करून चालकाला अटक केली आहे. यातून रेती तस्करीची आंतरराज्यीय साखळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

सेंदूरवाफा येथील नाकाबंदी चौकीवर मंगळवारच्या रात्री उशिरा पोलिसांना हा प्रकार लक्षात आला. नाकाबंदीदरम्यान, वाहनांची तपासणी करीत असताना एनएल ०१ / एजे २०२२ क्रमांकाच्या ट्रेलरमधून रेतीची वाहतूक होत असल्याचे लक्षात आले. ट्रेलरमधून रेतीची वाहतूक करणे अपेक्षित नसल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, या ट्रेलरमधून छत्तीसगड राज्यात धान्य, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तू नेल्या जायच्या. परत येताना त्या रिकाम्या ट्रेलरमध्ये छत्तीसगड राज्यातून रेती भरून भंडारामार्गे नागपूरकडे नेली जायची, असा प्रकार पुढे आला. या संदर्भात अटक केलेल्या वाहनचालकाने, या पद्धतीने रेती चोरून नेण्याची ही तिसरी फेरी असल्याचे सांगितले. सत्येंद्रकुमार बिरेंद्रसिंग सिह (४१, गाडीगुडा, छत्तीसगड) याला अटक करून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

पोलिस पोहचले छत्तीसगडमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक नुरूल यांच्या पुढाकारात रेती तस्करीविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. चौकशीसाठी पोलिसांचे पथक छत्तीसगडपर्यंत पोहचले. या तस्करीची अप्पर आणि लोअर लिंक तपासण्याचे काम पोलिसांनी आरंभले आहे. मात्र, रेतीघाट नक्षल क्षेत्रात असल्याने घाटमालकापर्यंत पोहचू शकले नाही.

छत्तीसगडच्या नक्षल क्षेत्रातून आली रेती ही रेती छत्तीसगडमधील कांकेर जिलह्यातील डावेर घाटातून आणल्याचे चौकशीत पुढे आले आहे. विशेष म्हणजे हा परिसर नक्षलग्रस्त आहे. मार्गात बंदोबस्तही मोठा असतो. त्यावर मात करून वाहतूक झाल्याने या तस्करीची पाळेमुळे किती खोलवर रुजली असावी, याचा अंदाज येतो. नाकाबंदीदरम्यान हा सगळा प्रकार उघडकीस आणला गेला. त्यामुळे तस्करांची नवी शक्कल समोर आली.

टॅग्स :bhandara-acभंडारा