भंडारा : पवनी तालुक्यातील वलनी येथील शिल्पा जांभुळकर हत्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या अक्षम्य दिरंगाई केल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांसह तंटामुक्त गाव समितीवर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र युवा परिषदच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.भारताला स्वातंत्र्य मिळून ६० वर्र्ष झाले. महिलांच्या सुरक्षेसाठी शासन दररोज नवनविन परिपत्रके काढत आहेत. कायदे कठोर करीत असताना भंडारा जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत. त्या खुल्या वातावरणात वावरु शकत नाही. जिल्ह्याच्या सुरक्षाची व्यवस्था ज्या यंत्रणेकडे आहे. त्याकडून महिलांना सुरक्षितता प्राप्त होत नाही. मुरमाडी प्रकरणातील आरोपीचा शोध अद्याप लागलेला नसताना वलनी येथील शिल्पा जांभुळकर हिची हत्या करण्यात आली. यामुळे महिला अत्याचाराच्या प्रकरणामध्ये विशेषत: अल्पवयीन मुलीबाबत आलेल्या तक्रारीमध्ये त्वरीत कारवाई करण्यात यावी, अशा तक्रारी तंटामुक्त गाव समितीकडे पाठविण्यात येऊ नये, वलनी येथील हत्या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या संबधित अधिकारी, तंटामुक्त गाव समितीविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात यावी, गावागावात महिलांच्या सुरक्षिततेकरीता समित्या गठीत करुन घटनांची त्वरीत दखल घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात योगेश लांजेवार, मीरा भट्ट, नीलिमा दळवी, समीर नवाज, मयुर मेहर, कविता खराबे, आम्रपाली, भाग्यश्री कोचे, सरीता रहांगडाले, पियुष चकोले, सैफाली फुले, पोर्णिमा शहारे, जयश्री येळणे, सविता खराबे, नजिया सय्यद, रुपाली वैद्य आदींचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)
पोलीस अधीक्षकांसह तंटामुक्त समितीविरुध्द कारवाई करा
By admin | Updated: March 1, 2015 00:37 IST