शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय मंजुरीविना केले तहसीलदारांनी भूमिपूजन !

By admin | Updated: January 14, 2017 00:27 IST

कान्हळगाव (सिरसोली) येथील शासकीय जागेतील मुरूमाच्या खाणीचे खोलीकरण करण्यात आले.

ग्रामस्थांची दिशाभूल : तोंडी आदेशाने सुरु झाले खोदकाम मोहाडी : कान्हळगाव (सिरसोली) येथील शासकीय जागेतील मुरूमाच्या खाणीचे खोलीकरण करण्यात आले. यासोबतच त्यालगत नॅडेप कंपोस्ट टाकी तयार करण्यात आली. तथापि, या दोन्ही कामांना प्रशासकीय मान्यता नसतानाही मोहाडीचे तहसिलदारांनी तोंडी आदेशान्वये परस्पर कामे सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आता झालेल्या कामाची मजुरी कोण देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.मोहाडीचे तहसिलदार धनंजय देशमुख यांनी कान्हळगाव येथील काही नागरिकांना विश्वासात घेऊन गावानजीकच्या मुरूमाच्या खाणीतील मुरूम काढण्याचे तोंडी आदेश दिले. कान्हळगाव जलशिवार योजनेत समाविष्ट असल्यामुळे खाणीच्या खोलीकरणाचे काम हाती घेता येते, असे सांगण्यात आले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्या कामाचे भूमिपूजन करून घेतले. त्या खाणीतून लाखो रूपयांचे गौण खनिज काढण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)जलयुक्त शिवार योजनेमध्ये कान्हळगाव आहे. लोकसहभागातून काम केले. तलाव करायच आहे. गाव सुशोभीत होणार. ग्रामपंचायत व सगळे गावकरी मिळून सहभाग आहे. नॅडेप टाकीसाठी प्रशासकीय मान्यता आहे.- धनंजय देशमुख, तहसीलदार मोहाडी.कान्हळगाव जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट नाही. ग्रामपंचायत कडून कोणत्याच संबंधित कामाचे प्रस्ताव आले नाही. शासकीय जागेत काम करता येत नाही. संबंधित जागेचे कागदपत्रे दिली नाही. त्या दोन्ही कामाची प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.- मनोज हिरूडकर, खंडविकास अधिकारी, मोहाडी.कान्हळगावात झालेल्या नॅडेप खाण खोलीकरणाचा कामाचा संबंध दूरवर नाही. याबाबत कुठे, कोणी, कसे काम केले, याबाबत कोणतीही माहिती नाही.- सुनिल ब्राम्हणकर, ग्रामसेवक कान्हळगाव.