शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण तलाव बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:23 IST

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात असलेला जलतरण तलाव गत वर्षभरापासून बंद आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील हा एकमेव प्रशिक्षण असणारे केंद्र बंद असल्याने जलतरणाचा सराव करण्यासाठी येणारे शेकडो बच्चे कंपनी आल्यापावली परत जात आहेत.

ठळक मुद्देबच्चे कंपनीचा हिरमोड : जिल्हा क्रीडा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात असलेला जलतरण तलाव गत वर्षभरापासून बंद आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील हा एकमेव प्रशिक्षण असणारे केंद्र बंद असल्याने जलतरणाचा सराव करण्यासाठी येणारे शेकडो बच्चे कंपनी आल्यापावली परत जात आहेत.जिल्हा मुख्यालयातील क्रीडा संकुलात असलेल्या जलतरण तलावाच्या समस्येबाबत साडेसाती संपलेली नाही. क्रीडा विभागात अनेक समस्यांचा अंबार असताना जलतरण तलावही त्यापासून सुटलेला नाही. मागील एक वर्षापूर्वी या तलावात एका बालकाचा बुडून मृत्यू झाला होता. त्या दिवसापासून हा तलाव बंदच आहे. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यामुळे अनेक पालक पाल्यांना घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गाठतात. मात्र जलतरण तलावच बंद असल्याने त्यांची घोर निराशा होत आहे.या तलावाच्या देखभाल दुरूस्तीकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणात शेवाळ साचले असून पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. तसचे तलावाच्या टाईल्स निखळल्या आहेत.तलावाची दुरवस्थाऐसपैस जागेत असलेल्या या तलावाची चांगलीच दुरवस्था झाली आहे. मागील वर्षी हा तलाव प्रशिक्षणासाठी सुरु तरी होता. मात्र घटनेनंतर सदर प्रशिक्षण केंद्र बंद अवस्थेत आहे. तलावातील टाईल्स तुटलेल्या असून केरकचरा व धुळ साचलेली आहे. चेंजींग रुम व शॉवरचीही तशीच अवस्था आहे. सभोवताली झाडीझुडपी व केरकचरा दिसून येतो. निधीअभावी सदर जलतरण तलावाला गतवैभव प्राप्त होत नसल्याची माहिती समोर आली. दरम्यान जिल्हा क्रीडा विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी याबाबत पुढाकार घेऊन जिल्ह्यातील एकमेव जलतरण तलाव पुन्हा सुरु करावा अशी मागणी आहे.जलतरण तलावची नेमकी काय स्थिती आहे याबाबत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी चर्चा करू. योग्य तो निर्णय घेतला जाईल.-शांतनू गोयल,जिल्हाधिकारी, भंडारा.

टॅग्स :Swimmingपोहणे