लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलानाला भंडारा शहरात प्रतिसाद मिळाला असून नागपूर नाका येथे १० आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करुन त्यांची सुटका केली.अटक करण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश चोपकर, संघटक सचिन मेश्राम, रवि मेहर, प्रमोद केसरकर, प्रभाकर सार्वे, दिगांबर रेवतकर, दिनेश मांढरे, सुरज निंबार्ते, सुखदेव रेहपाडे, पिंटू जनबंधू यांचा समावेश आहे.गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकाच्या खात्यावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मध्यरात्रीपासूनच 'दूध संकलन बंद' आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटत असून भंडारा येथे सोमवारला सकाळच्या सुमारास आंदोलन करण्यात आले. भंडारा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याच्या कारणावरुन आंदोलनकर्त्यांना अटक करुन त्यांची सुटका केली.
‘स्वाभिमानी’नी ओतले रस्त्यावर दूध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:52 IST
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलानाला भंडारा शहरात प्रतिसाद मिळाला असून नागपूर नाका येथे १० आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करुन त्यांची सुटका केली. अटक करण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश चोपकर, संघटक सचिन मेश्राम, रवि मेहर, प्रमोद केसरकर, प्रभाकर सार्वे, दिगांबर रेवतकर, दिनेश मांढरे, सुरज निंबार्ते, सुखदेव रेहपाडे, पिंटू जनबंधू यांचा समावेश आहे.
‘स्वाभिमानी’नी ओतले रस्त्यावर दूध
ठळक मुद्देआंदोलन : १० आंदोलनकर्त्यांना अटक