मोहन भोयर लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर येथील अॅक्सिस बँकेतून नियमबाह्यपणे काढलेले ५ कोटी रुपये राजकमल लॉन्ड्रीतून मंगळवारी पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणात एकूण ११ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यात पुन्हा एका आरोपीची भर पडली असून त्या आरोपीला छत्तीसगड राज्यातील रायपूर येथून अटक करण्यात आली. ५ कोटी रुपयांचे दिल्ली कनेक्शन असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
आयकर अधिकारी सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींचे बँक डिटेल्स घेत असल्याची माहिती आहे. राजकमल लॉन्ड्रीत पाच कोटी रुपये बँकेतून आणून ठेवण्यात आले होते.
एकूण आरोपींची संख्या १२५ कोटींच्या रकमेसह एकूण ११ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तपासात पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे १२ वा आरोपीला रायपूर येथून अटक करण्यात आली. त्यामुळे येथे एकूण आरोपींची संख्या ही १२ झाली आहे. रायपूर येथून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सांगण्यात असमर्थता दर्शविली. पोलिस कोठडी संपायला अजून दोन दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर पोलिस आरोपींची पुन्हा पोलिस कोठडी वाढवून मागते काय याकडे लक्ष लागून आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनीही याबाबत तपासाबाबत मार्गदर्शन केले आहे. या प्रकरणात अजून कोणते धागेदोरे गवसतात याकडे पोलिसांचा तपास आहे.
आरोपींचे दिल्ली कनेक्शनआयकर विभागाने गोंदिया येथे जाऊन या प्रकरणात चौकशी केल्याची माहिती पुढे आली होती. येथे आरोपींची दिल्ली कनेक्शन असल्याचीही चर्चा आहे. आरोपींचे छत्तीसगड, मध्य प्रदेश, दिल्ली येथे नेटवर्कचा तपास सुरू असून अॅक्सिस बँकेतून काढलेली रोकड आरोपी कुठे घेऊन जात होते हा तपासाचा मुख्य भाग आहे.
आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी येथे अटक करण्यात आलेल्या आरोपींची बँक डिटेल्स घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. येथे आरोपींनी बँकेला टार्गेट केल्याचे दिसून येते. पुन्हा या आरोपींची नेटवर्क कुठे आहे याचाही तपास सध्या पोलिस करीत आहे. स्थानिक पोलिस व भंडारा येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.