शहरं
Join us  
Trending Stories
1
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
2
निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण
3
Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
4
भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार; RBI गव्हर्नर मल्होत्रांचा मोठा दावा, कुणाला दिलं श्रेय?
5
एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन 'लँडिंग'; हवेत असतानाच इंजिनला लागली आग, प्रवासी सुखरूप
6
टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'
7
फक्त १ लाख रुपये जमा करून मिळवा १४,३२५ रुपये निश्चित व्याज! कॅनरा बँकेने आणखी खास FD योजना
8
'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द
9
"आमच्या मालिकेवेळी तिला पुन्हा कॅन्सर...", प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोध भावेची भावुक पोस्ट
10
Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!
11
जि.प.च्या शाळेने सुरू केली सायकल बँक; कष्टकऱ्यांच्या लेकरांची थांबली पायपीट!
12
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
13
Maharashtra Rains: महाराष्ट्रात पावसाचा कहर, तुमच्या जिल्ह्यात किती टक्के बरसला? जाणून घ्या आकडा
14
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
15
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
16
नंदुरबारमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास
17
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
18
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
19
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
20
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 

बदल्यांना स्थगनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2015 01:22 IST

आर.टी.ई. अ‍ॅक्ट मधील तरतुदीनुसार शिक्षकांच्या पदनिश्चितीबाबत कार्यवाही पूर्ण होत नाही ...

तुमसर / पवनी : आर.टी.ई. अ‍ॅक्ट मधील तरतुदीनुसार शिक्षकांच्या पदनिश्चितीबाबत कार्यवाही पूर्ण होत नाही तथा न्यायालयाकडून जैसे थे परिस्थितीबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून यात आपसी बदल्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नये, असा आदेश राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना ग्रामविकास मंत्रालयाने दिला आहे.ग्रामविकास व जलसंधारण विभागाने १८ मे ला राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश निर्गमित केले. यात आपसी बदल्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रशासकीय, विनंती बदल्या, आंतरजिल्हा, बदल्या करण्यात येऊ नयेत, असा आदेश आहे. १८ मे २०१५ पूर्वी ज्या जिल्हा परिषदांतर्गत शिक्षकांच्या आपसी बदल्या व्यतिरिक्त जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा बदल्या झाल्या असल्यास त्या बदल्या स्थगित करण्यात याव्यात असे आदेशात नमूद केले आहे.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक पीटीआर १११३ दि. १३ डिसेंबर २०१३ अन्वये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर, विद्यार्थी-शिक्षक यांचे प्रमाण विचारात घेवून शिक्षकांची सेवा उपलब्ध करून देणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शासन निर्णयानुसार मुख्याध्यापकांची जिल्हानिहाय मंजूर पदांची संख्या कमी होत असल्याने शिक्षक संघटनांनी याचिका दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाने ३१ डिसेंबर २०१४ रोजी सुनावणी होवून १३ डिसेंबर २०१३ च्या शासन निर्णयास जैसे थे परिस्थिती ठेवण्याबाबत निर्णय दिलेला आहे. परिणामी २०१४-१५ संच मान्यता पूर्ण झालेली नाही.त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, मुख्याध्यापक पदोन्नती, पदावनती, पदवीधर शिक्षक पदोन्नती इत्यादी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नसल्याने सद्यस्थितीत आपसी बदली वगळता इतर बदल्या करणे अडचणीचे होत असल्याचे सर्वसाधारण सर्व जिल्ह्यात परिस्थिती आहे, असा अभिप्राय शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांनीही शासनास कळविला होता, असे ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे कक्ष अधिकारी संजय कुळवे यांनी आदेशात नमूद केले आहे. १६ मे रोजी खासदार नाना पटोले व आमदार वाघमारे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना भ्रमणध्वनीवर शिक्षकाच्या बदली प्रकरणात अनियमिततेची तक्रार केल्याने मुंडे यांनी दखल घेण्याची हमी दिली होती, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)