शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनासाठी सापांचे जीवदान महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

आज नागपंचमी सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणून नागपंचमी सणाची ओळख आहे. यानंतरच सणांची रेलचेल सुरू होते. श्रावण सोमवारनंतर येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या नागपंचमी सणादिवशी अनेक जण सापाची पूजा करतात. मात्र आता फक्त सापांची पूजा करूनच चालणार नाही तर सापांना वाचविण्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे.

ठळक मुद्देवनविभागाच्या पुढाकाराची गरज : आज नागपंचमी, आजही ग्रामीण भागात सापांचा नाहक जातोय बळी

सिराज शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : साप किंवा नाग म्हटल्यावर कोणाचाही थरकाप उडतो. दिवसेंदिवस सापांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याने पर्यावरण संवर्धन धोक्यात येत आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत सापांचे अनन्यसाधारण महत्व आहे.आज नागपंचमी सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणून नागपंचमी सणाची ओळख आहे. यानंतरच सणांची रेलचेल सुरू होते. श्रावण सोमवारनंतर येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या नागपंचमी सणादिवशी अनेक जण सापाची पूजा करतात. मात्र आता फक्त सापांची पूजा करूनच चालणार नाही तर सापांना वाचविण्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे. शेतकऱ्याचा खऱ्या अर्थाने साप हा मित्र आहे. शेतात पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांचा नायनाट करण्यासह महत्वाची भूमिका निभावणाऱ्या या सापाला अनेकदा मारले जाते. मात्र आज खऱ्या अर्थाने वनसंपदा असलेल्या आपल्या जिल्ह्यात सर्पमित्रांकडून साप संवर्धनाची मोहीम राबविण्याची गरज आहे. साप निघाल्यानंतर तात्काळ सर्पमित्राला फोन करून बोलाविल्या जाते. मात्र आजही काही ठिकाणी साप दिसताच त्याला ठेचून मारले जाते. मात्र निसर्गसाखळी सापाचे असणारे महत्व लक्षात घेता आज जिल्हा प्रशासनासह सर्पमित्रांनी व्यापक मोहीम राबविण्याची गरज आहे. आजही अनेक ठिकाणी गारूडी हा स्वत:चे पोट भरण्यासाठी सापांचे खेळ करतात. मात्र खºया अर्थाने सर्पमित्र हे विनामूल्य सापांचा जीव वाचवतात. यासाठी प्रशासनाकडून विस्तृत मोहिम राबविण्याची गरज आहे.वनविभागाकडून सर्पमित्रांसाठी विविध प्रशिक्षणे राबविण्याची गरज आहे. मात्र वनविभागाच्या अनास्थेमुळे आज कुठेही सर्पमित्रांचे प्रशिक्षण अथवा जनजागृती होताना दिसून येत नाही.आजही सर्वसामान्यांमध्ये सापांबद्दल असणारी भीती कमी करून सापांना जीवदान देण्याची गरज आहे. सापांच्या असलेल्या विविध प्रकारच्या जाती तसेच त्यातील विषारी कोणत्या, बिनविषारी कोणत्या तसेच सापाचे निसर्गातील असलेले महत्व सर्पदंशानंतर करण्याचे येणारे प्राथमिक उपचार यासाठी वनविभागाने जनजागृती करण्याची गरज आहे.शासनाकडून सर्पमित्र दूर्लक्षितग्रामीण भागासह अनेक ठिकाणी सर्पमित्र फोन येताच तात्काळ हजर होतात. अनेक ठिकाणी सापांना पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडतात. सापांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य निभवणारे सर्पमित्र आज शासनाकडून दुर्लक्षित झाले आहे. शासनाने सर्पमित्रांना अल्प मानधन सुरू करून विविध योजनेचा फायदा देण्याची गरज आहे.

टॅग्स :Nag Panchamiनागपंचमीsnakeसाप