जिल्ह्यातील चार लाख ८५ हजार व्यक्तीचे सर्व्हेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 05:00 AM2020-10-01T05:00:00+5:302020-10-01T05:00:34+5:30

जिल्ह्यात चार लाख ८५ हजार ८७४ व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्यात को-मॉरबिड (रक्तदाब, शुगर यासह इतर आजार) रुग्णांची संख्या २५ हजार ७९२ आहे. २९२ व्यक्तींना संदर्भीत करण्यात आले असून त्यापैकी ६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यात चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सर्व संशयित व्यक्तींनी कोविड १९ ची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.

Survey of four lakh 85 thousand persons in the district | जिल्ह्यातील चार लाख ८५ हजार व्यक्तीचे सर्व्हेक्षण

जिल्ह्यातील चार लाख ८५ हजार व्यक्तीचे सर्व्हेक्षण

Next
ठळक मुद्देमाझे कुटुंब, माझी जबाबदार मोहीम : २९२ व्यक्ती संदर्भीत, ८६८ पथके कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नवीन जीवनशैली पध्दतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करण्यासाठी जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात येत असून गत १५ दिवसात चार लाख ८५ हजार ८७४ व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यासाठी जिल्ह्यात ६६८ पथके कार्यरत असून सर्व्हेक्षणादरम्यान २९२ व्यक्तींना संदर्भीत करण्यात आले आहे.
जिल्ह्यात १५ सप्टेंबरपासून या मोहीमेचा पहिला टप्पा सुरु झाला. ही मोहीम १० ऑक्टोबरपर्यंत सुरु राहील. तर दुसरा टप्पा १२ आॅक्टोबरपासून राबविला जाणार आहे. गत १५ दिवसात जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. ८६८ पथकांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्यात आले. ग्रामीण भागासाठी ७९७ तर शहरी भागासाठी ७१ पथके तयार करण्यात आले आहे. सदर पथक घरोघरी जावून आरोग्य सर्व्हेक्षणाची कामे करीत असून माहिती शासनाच्या मोबाईल अ‍ॅपवर अपलोड करीत आहेत.
जिल्ह्यात चार लाख ८५ हजार ८७४ व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्यात को-मॉरबिड (रक्तदाब, शुगर यासह इतर आजार) रुग्णांची संख्या २५ हजार ७९२ आहे. २९२ व्यक्तींना संदर्भीत करण्यात आले असून त्यापैकी ६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यात चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सर्व संशयित व्यक्तींनी कोविड १९ ची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत आशा कार्यकर्त्यांद्वारे सर्व्हेक्षणामध्ये घरांना भेटी देताना लोकांशी संवाद साधून सदर मोहिमेची सेल्फी काढण्यात येऊन मोहिमेसंबंधी व कोविडसंबंधी माहिती देण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी, खाजगी रुग्णालय, आशा स्वयंसेवीका या मोहिमेत सहभागी झाल्या असून मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Survey of four lakh 85 thousand persons in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.