शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
2
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
3
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
4
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
5
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
6
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
7
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
8
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
9
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
10
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
11
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
12
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
13
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
14
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
15
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
16
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
17
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
18
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
19
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
20
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक

सुरांनी गाजली भंडारा आयडल स्पर्धा

By admin | Updated: November 13, 2015 00:51 IST

लोकमत सखीमंच, युवानेक्स्ट व बालविकास मंचतर्फे येथील आनंद सभागृहात भंडारा आयडल, मास्टरशेफ व छोटेकुकचे आयोजन करण्यात आले.

भंडारा : लोकमत सखीमंच, युवानेक्स्ट व बालविकास मंचतर्फे येथील आनंद सभागृहात भंडारा आयडल, मास्टरशेफ व छोटेकुकचे आयोजन करण्यात आले. बालविकास मंच सदस्यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी या विषयावर पपेट शो करण्यात आले. कार्यक्रमात विजयी स्पर्धकांना मानचिन्ह व भेटवस्तु देवून गौरविण्यात आले. उद्घाटन संतोष कपूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळीप्रमुख अतिथी सुदीप शहारे, नितीन धकाते, आशिष खराबे, निशा थोटे, अमित कपूर, विलास शेंडे, प्राचार्य प्रिती धनवलकर, प्राचार्य सुदमा वंजारी आदी उपस्थित होते.प्रथम आयोजित व्यंजन स्पर्धेत ठराविक नियमाप्रमाणे आरोग्यपूर्ण स्वादिष्ट व आकर्षक सजावट केलेल्या व्यंजनाला परिक्षकांनी प्रत्यक्ष विधी वाचून स्पर्धकांना प्रश्नउत्तर करून व्यंजनांची लज्जत चाखली. मास्टरशेफ स्पर्धेत प्रथम क्रमांकाकरिता अल्का खराबे, द्वितीय आरती रासे तर तृतीय नंदा चेटूले यांची निवड करण्यात आली. छोटे कुक स्पर्धा वयोगट ५ ते १० मधून प्रथम क्रमांक धिमयी कळंबे, द्वितीय नंदिनी भावसार तर जय सेलोकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. वयोगट ११ ते १५ मधून मैत्री रक्षिये प्रथम, ओजस ढेंगे तर तृतीय क्रमांक वैदेही गिऱ्हेपुंजे यांनी प्राप्त केला. स्पर्धेचे परिक्षण मंगला डहाके व संध्या किरोलिकर यांनी केले. उपस्थित पालक व दर्शकांनी व्यंजनांची लज्जतदार चव घेऊन त्यांची स्तुती केली. भंडारा आयडल स्पर्धेत बालविकास मंच गटातून चेतन कोटांगले प्रथम, श्रिया टांगले द्वितीय, तृतीय क्रमांक कृतिका सुर यांनी पटकाविला. विशेष पारितोषिक वैदेही हाडगेने प्राप्त केला. सखीमंच गटातून प्रथम क्रमांक दिप्ती बोबडे, सुप्रिया रेहपाडे द्वितीय गरिमा वैद्य तृतीय तर विशेष पारितोषिकासाठी रामदुलारी हरदेनिया मानकरी ठरल्या. युवानेक्स्ट गटात निलेश सुर्यवंशी प्रथम, सोनाली मानकर द्वितीय, डेव्हीड भालाधरे तृतीय व विशेष पुरस्काराचा मानकरी गगन बिसेन ठरला. परिक्षण स्मिता गालगाडे, राहुल हुमणे व पराग डहाके यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा संयोजक ललित घाटबांधे व आभार जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी मानले. कार्यक्रमात सुदीप कम्प्युटर्स व कॅफे रेड रोज रेसिडन्सी, ओम साई रेस्टारंट, एन्जल ब्रोळींग यांचे सौजन्य लाभले. सुहासीनी अल्लडवार, राखी सूर, मनिषा रक्षिये, किरण भावसागर, स्रेहा वरकडे, लतीषा खोत, धनू खोत, श्री खोत व शशांक रामप्रसाद यांनी सहकार्य केले.(मंच प्रतिनिधी)