शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य! पालांदूर परिसरात कृषिपंपांना चोवीस तास वीजपुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 05:00 IST

महावितरण उन्हाळ्यात विजेचे नियोजन करण्यात अपयशी ठरत आहे. कुठे आठ तास तर कुठे २४ तास तर कुठे १६ तास विजेचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे सर्व वीजग्राहकांना समान न्याय मिळत नाही. विजेची तूट निर्माण झाल्यास समायोजनच्या नावाखाली मात्र सर्वांनाच वीज दरवाढीचा शॉक दिला जातो. संकट उभे झाले की शासनाकडे बोट दाखविला जातो. मात्र, स्वतःच्या उत्पन्नावर नियोजन अजून तरी ‘महावितरण’ने केलेले दिसत नाही.

मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर : अख्ख्या महाराष्ट्रात विजेच्या भारनियमनाने भाजून निघत आहे.  शेतीला अधिकृत आठ तास वीज देणे महावितरणला अडचणीचे होत आहे; परंतु गावठाणाला जोडलेल्या कृषीपंपांमुळे पालांदूर परिसरातील कृषीपंपांना २४ तास वीजपुरवठा होत आहे. गत तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असून २४ तास वीजपुरवठ्याने घरगुती विहिरींनी तळ गाठून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.महावितरण उन्हाळ्यात विजेचे नियोजन करण्यात अपयशी ठरत आहे. कुठे आठ तास तर कुठे २४ तास तर कुठे १६ तास विजेचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे सर्व वीजग्राहकांना समान न्याय मिळत नाही. विजेची तूट निर्माण झाल्यास समायोजनच्या नावाखाली मात्र सर्वांनाच वीज दरवाढीचा शॉक दिला जातो. संकट उभे झाले की शासनाकडे बोट दाखविला जातो. मात्र, स्वतःच्या उत्पन्नावर नियोजन अजून तरी ‘महावितरण’ने केलेले दिसत नाही. पालांदूर येथील सुमारे ४० कृषीपंप गाव फिडरवर आजही जोडलेले आहेत.  गावठाणाला जोडलेल्या कृषिपंपांना २४ तास थ्री फेस वीज पुरविली जात आहे. त्यामुळे शेतकरी पाण्याच्या नियोजनाने अधिकची शेती उत्पन्नाखाली आणत आहे. एक पंप चार एकरापर्यंत शेतीचे सिंचन करतो आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा सर्वाधिक होऊन गावातील घरगुती विहिरींनी तळ गाठलेला आहे. नळ योजना असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या नाही. मात्र, इतर कामांसाठी स्वतंत्र विहिरीतील पाणी उन्हाळ्याच्या दिवसात मिळत नाही. कित्येक कुटुंब २४ तास विजेच्या पुरवठ्यामुळे विहिरी कोरड्या करून बसले आहेत.

वीज वितरणच्या नियोजनातील त्रुटी

- एकीकडे भारनियमनामुळे कृषीपंपांना वीज मिळणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना २४ तास कृषीपंपाला वीज मिळत आहे. ही समाधानाची बाब असली तरी अतिरिक्त पाणी उपसामुळे गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. वीज वितरण कंपनीने केलेले नियोजन येथे अपयशी ठरल्याने गावात मात्र पाणी टंचाई निर्माण झाली.

गावठाण फिडरवरून कृषी फिडर मोकळे करण्यासाठी पाठविलेले नियोजन मंजूर झालेले आहे. त्या  वर्कऑर्डरसुद्धा झालेली आहे. किमान महिनाभरात  कृषी फिडर गाव फिडर वरून वेगळे करण्यात येईल. -मयंक सिंग, सहाय्यक अभियंता, पालांदूर.

गावठाण फिडरवरून कृषी फिडर मोकळे करण्यासाठी पाठविलेले नियोजन मंजूर झालेले आहे. त्या  वर्कऑर्डरसुद्धा झालेली आहे. किमान महिनाभरात  कृषी फिडर गाव फिडर वरून वेगळे करण्यात येईल. -मयंक सिंग, सहाय्यक अभियंता, पालांदूर.

 

टॅग्स :electricityवीजIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प