शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

सुर नदी पुन्हा प्रवाहित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 10:41 PM

तालुक्यातील सुरनदी, गायमुख नदी, लहान ओढे, तसेच सिमेंट प्लग बंधाऱ्यातील प्रवाह थांबला आहे. आता या नद्या व बंधाऱ्यातून प्र्रवाह वाहायला चार-पाच महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ठळक मुद्देपेंचचे पाणी येणार : पाणी टंचाईवर उपाय

आॅनलाईन लोकमतमोहाडी : तालुक्यातील सुरनदी, गायमुख नदी, लहान ओढे, तसेच सिमेंट प्लग बंधाऱ्यातील प्रवाह थांबला आहे. आता या नद्या व बंधाऱ्यातून प्र्रवाह वाहायला चार-पाच महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तथापि, पाणी टंचाईवर उपाय म्हणून पेंच प्रकल्पाचे पाणी सुरनदीमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोरडी झालेली सुरनदी पुन्हा प्रवाहित होणार आहे.पाणीटंचाईची झळ आतापासूनच जाणवू लागली आहे. दरवर्षी पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. पाणी पुरवठा योजना असतानाही त्या योजना प्रभावित होतात. मोहाडी व मोहगाव देवी येथील नागरिकांना एक दोन दिवसाआड उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मिळत असते. तेही मुबलक नाही. एका दिवसाचा पाणी तीन तीन दिवस पाणी पिण्यासाठी वापरला जातो. एवढी गंभीर परिस्थिती मोहाडी येथे निर्माण होते. नळाचे पाणी मिळावे म्हणून अनेक घरी खोल टाकी केली गेली आहे. मोहाडीत वॉडावॉर्डात हातपंप असले तरी पिण्यायोग्य पाणी नाही. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक कुटुंबांना विकत पाणी घ्यावे लागते.सुरनदीचा पाणी पावसाळ्यात पूर्ण वाहून जातो. पाणी अडविण्याची व्यवस्था कुठेच केली गेली नाही. रोहना मार्गावर कोल्हापूरी बंधारा आहे. त्या बंधाºयातही एक थेंबही पाणी उन्हाळ्यात दिसत नाही. शिवाय असे कोल्हापुरी बंधारे कान्हळगाव, मोहाडी येथे आहेत पण शासन व प्रशासनाच्या अनास्थेपायी या बंधाºयांची परिस्थिती वाईट झाली आहे. पाणी अडविण्यासाठी लहान नद्या, ओठ्यांवर शाश्वत उपाय अजुनतरी झाले नाही. तालुक्यात जलयुक्त शिवार अंतर्गत छान काम झाले आहे. बऱ्याच बंधाऱ्यात पाणी साचून राहते. पण, याचा वापर शेतकरी, कृषी उत्पन्न घेण्यासाठी तसेच जनावरांना पाणी पाजण्यासाठी करीत असतो.दरवर्षी भूजल पातळीत घट होत आहे. शासनाकडून मिळणाऱ्या विहिरीतही बोअर केली जाते. यावरून पाण्याची समस्या बिकटच होत चालली आहे. मोहाडी तालुक्यातील ग्रामीण विभागाची लोकसंख्या १,६१,७९४ एवढी आहे. ७७ ग्रामपंचायती व ९६ गावे आहेत. मोहाडी तालुक्यात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना एक आहे. स्वतंत्र पाणी पुरवठा योजना ७७, यापैकी एक योजना बंद अवस्थेत आहे. ७२७ हातपंप आहेत व सार्वजनिक विहिरी ३३३ अशी पिण्याच्या पाण्याची साधने आहेत. वरठी येथील प्रस्तावित योजनेत निविदा कार्यवाही सुरू आहे.कुशारी येथील निविदा कार्यवाही सुरू क रण्यात आली आहे. शिवणी येथील योजनेसाठी तांत्रिक मंजुरी प्राप्त झाली असून प्रशासकीय मान्यतेची कार्यवाहीसाठी प्रतिक्षा आहे. मोहगाव देवी, जांब, नवेगाव, धुसाळा येथील प्रस्तावाचे प्राकलन सादर झाले आहे. मोहाडी तालुक्यात विहिरी खोल करणे व गाळ काढण्यासाठी १४ गाव व कामे १७, बुडक्या घेणे, खाजगी विहिरीचे अधिग्रहाची ३ कामे ३ गावात, नळ योजनांची विशेष दुरूस्ती २६ गावात, विंधन विहरीची विशेष दुरूस्तीची ८ कामे ५ गावात, विंधन विहरी ५० गावात ७७ कामे असे १३१ कामे घेण्यात येणार आहेत. यासाठी १४४.११ लक्ष रूयये खर्च करण्यात येणार आहे. एप्रिल ते जून या महिन्यात विहिरी खोल करण्याची कामे ४३ घेण्यात येतील. नळयोजनांची दुरूस्ती ३ गावात करण्यात येणार आहे.