शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाला सहकार्य करा, लम्पी रोगाला पळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 21:42 IST

स्वच्छता पाळीत लसीकरण मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मचारनाचे सरपंच संगीता घोनमोडे यांसह आणखी इतर  ग्रामपंचायतीच्या वतीने आर्थिक सहकार्य करीत लसीकरण मोहिमेला सहकार्य केले आहे. शासन, प्रशासन स्तरावरून लसीकरणासाठी मदत मिळत आहे. पशुपालकांनी लम्पीविषयी मनात अजिबात भीती न ठेवता गोठ्यातील स्वच्छता आणि लसीकरण केल्यास नक्कीच आजार दूर होत असल्याची ग्वाही डॉ. नगराळे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : देशभरात लम्पी या संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे पशुपालकांत भीतीचे वातावरण आहे. भंडारा जिल्ह्यात अजूनपर्यंत तरी या संसर्गजन्य आजाराची लागण नसली तरी काळजी घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनासह पालांदूर येथील प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवयानी नगराळे यांनी पशुपालकांची रात्रीची शाळा घेत लसीकरण सुरू केले आहे. स्वच्छता पाळीत लसीकरण मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मचारनाचे सरपंच संगीता घोनमोडे यांसह आणखी इतर  ग्रामपंचायतीच्या वतीने आर्थिक सहकार्य करीत लसीकरण मोहिमेला सहकार्य केले आहे. शासन, प्रशासन स्तरावरून लसीकरणासाठी मदत मिळत आहे. पशुपालकांनी लम्पीविषयी मनात अजिबात भीती न ठेवता गोठ्यातील स्वच्छता आणि लसीकरण केल्यास नक्कीच आजार दूर होत असल्याची ग्वाही डॉ. नगराळे यांनी दिली.लसीकरणासाठी पट्टीबंधक टिचकुले, प्रमोद सहारे, परिचर अर्जुन खंडाईत, मिलिंद खोब्रागडे, संजय सेलोकेर, प्रशांत उरकुडे, गुलशन गोटेफोडे, शेंडे आणि गावचे सरपंच यांच्या सहकार्याने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. ग्रामीण भागात लम्पीबाबत विविध गैरसमज पसरविले जात असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले.

८० टक्के घरात केले जाते पशुसंवर्धन

- पालांदूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत २२ गावांचा कारभार बघितला जातो. येथील शेती हाच मुख्य उद्योग असल्याने ८० टक्के घरात पशुसंवर्धन केले जात आहे. लम्पी रोगाविषयी डॉक्टर देवयानी नगराळे यांनी गावागावांत जात गावच्या सरपंचाच्या उपस्थितीत पशुपालकांना आजाराविषयी माहिती देत सावध राहण्याकरिता शून्य खर्चातील उपाय योजना सांगितलेल्या आहेत. लसीकरणात पालांदूर, कवलेवाडा, मेंगापूर, जेवणाळा व मचारना यांसह १३ गावात लसीकरण आटोपलेले आहे.

 

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग