शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

शालेय सहलीसाठी मागेल तेवढ्या बसेसचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 06:00 IST

मात्र शालेय सहलीसाठी खाजगी वाहनांचा वापर करण्याचा प्रकार गेल्या काही वर्षात वाढला आहे. मात्र खाजगी वाहनातून प्रवास करतांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ना शाळा घेते ना खाजगी वाहन चालक. त्यामुळे अनेकदा पालक आपल्या पाल्यांना सहलीला जाण्यासाठी देखील नकार देतात. अनेकवेळा रस्त्यातच गाड्या बंद पडतात. त्यासाठी कोणतीच पर्यायी व्यवस्था नसते.

ठळक मुद्देसुरक्षेची मिळणार हमी : विभागीय नियंत्रकांनी दिले आगार प्रमुखांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातच नव्हे तर देशात सर्वात मोठे परिवहन म्हणून ओळखल्या जाणारा राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) ने यावर्षीच्या शालेय सहलीसह लग्नकार्य असो अथवा घरगुती समारंभासाठी चांगला निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक विनोद भालेराव यांनी प्रासंगीक करारावर शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी ‘बसगाड्या मागेल तितक्या पुरवठा करणार असल्याचे सांगितले.तशा सुचना भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील आगार प्रमुखांना दिल्याचे सांगितले. यंदाच्या शैक्षणिक सहली अधिक सुरक्षित होण्यास मदत मिळणार आहे.शैक्षणिक अभ्यासक्रमातील विविध घटकांची प्रात्याक्षिके, भौगोलिक, ऐतिहासीक घटनास्थळांना भेटी देण्यासाठी अनेक शाळांमधून शैक्षणिक सहलींचे आयोजन दरवर्षी केले जाते.मात्र शालेय सहलीसाठी खाजगी वाहनांचा वापर करण्याचा प्रकार गेल्या काही वर्षात वाढला आहे. मात्र खाजगी वाहनातून प्रवास करतांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ना शाळा घेते ना खाजगी वाहन चालक. त्यामुळे अनेकदा पालक आपल्या पाल्यांना सहलीला जाण्यासाठी देखील नकार देतात. अनेकवेळा रस्त्यातच गाड्या बंद पडतात. त्यासाठी कोणतीच पर्यायी व्यवस्था नसते.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एस.टी. विभागाने संपूर्ण राज्यभरात विशेष नियोजन केले असून एसटीच्या आयुक्तांनी याबाबतची माहिती राज्यातील सर्व आगाराना दिल्या आहेत.भंडारातून परजिल्ह्यात विद्यार्थ्यांना घेवून जाता येते. सहलीसाठी एसटी बसेसचा प्रवासात असतांना काही तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी एसटीची व्यवस्था देखील जवळच्या आगारातून फोनद्वारे करुन दिली जाते किंवा त्याच जिल्ह्यात व्हॅन दुरुस्ती पथकाद्वारे तिथेच बसची तात्काळ दुरुस्ती केली जाते. हा फायदा होत असल्याने दुर्घटना घडल्यास एसटी महामंडळाच्या गाडीत प्रवास करतांना विमा संरक्षण प्रवाशांसाठी लागू आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान किमान दहा लाखापर्यंत विमा किंवा मदत मिळू शकते.शालेय सहलींचा हंगाम सुरु झाला आहे. सहलीसाठी ज्या शाळांना बसेस नोंदणी करायच्या आहेत, त्यांनी आम्हाला लेखी पत्राद्वारे कळवावे. मागेल त्या शाळेला सहलीसाठी गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. सुरक्षीत प्रवासाच्या सहलींसाठी शाळांनी एसटी बसचा वापर करता येईल.- विनोद भालेराव,विभागीय नियंत्रकएसटी महामंडळ, भंडारा

टॅग्स :state transportएसटीtourismपर्यटन