शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रध्दा निर्मूलन प्रबोधन शिबिर

By admin | Updated: January 27, 2015 23:28 IST

नजिकच्या कुंभली यात्रेतील दुर्गाबाईचा डोह यात्रेच्या ठिकाणी अंधश्रध्दा निर्मुलन समिती व राज्य सरकारी कर्मचारी संघटना शाखा साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रध्दा निर्मुलन व जादुटोणा

साकोली : नजिकच्या कुंभली यात्रेतील दुर्गाबाईचा डोह यात्रेच्या ठिकाणी अंधश्रध्दा निर्मुलन समिती व राज्य सरकारी कर्मचारी संघटना शाखा साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रध्दा निर्मुलन व जादुटोणा विरोधी कायदा व वैद्यानिक दृष्टीकोण या विषयावर तंज्ञाचा मार्गदार्शन व प्रात्यक्षिके घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक अ.भा. अंनिसचे विदर्भ संघटक हरिभाऊ पातोडे यांचे हस्ते तर अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा संघटक वसंत लाखे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रकाश धोटे, अध्यक्ष एस. एस. चव्हाण, मदन बांडेबुचे, मुलचंद कुकडे, राम येवले, प्रा. अशोक गायधने, डी. जी. रंगारी, ठाणेदार भगवान खारतोडे, विमल हुकरे, रमेश गाटेफोडे, घनश्याम राऊत, अ. शी. रंगारी उपस्थित होते.कार्यक्रमात डॉ. प्रकाश थोटे, एस. एस. चव्हाण, डी.जी. रंगारी, मदन बांडेबुचे, मुलचंद कुकडे, प्रा. प्रोफेसर बहोकर, बी. एल. मेश्राम, वसंत लाखे, अशोक गायधने इत्यादी मान्यवरांनी प्रात्यक्षिकातून प्रबोधन केले. के. एस. रंगारी यांनी अंधश्रध्दा निर्मुलनावर आधारित अनेक गीत सादर केले. याशिवाय जादुटोणा, भूत, भानामती, तंत्रमंत्र, देवी अंगात येणे हे सिध्द करणाऱ्यास २१ लाखांचे बक्षीस देण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु हे आवाहन एकाही देविने स्विकारले नाहीत. तसेच यात्रेत जादुटोणा विरोधी कायदयाचे पत्रक वाटण्यात आले. डी. जी. रंगारी यांनी तांत्रिक-मांत्रिक-बुबा-बाबा कशी जनतेची लुबाडणूक व फसवणूक करतात हे प्रयोगाच्या माध्यमातून प्रबोधन केले. कार्यक्रमाचे संचालन बी. एल. मेश्राम यांनी केले तर आभार यशवंत उपरीकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता डॉ. आयोजक डी. जी. रंगारी, यशवंत उपरीकर, बी. एल. मेश्राम, टेकराम वलथरे, भारती रंगारी, नरेश रामटेके, आशा वासनिक, बी. डी. धारगावे, उंदिरवाडे, भिमराव मोटघरे, नामदेव कान्हे्रर, राजू बन्सोड, पी.एल. वैद्य, के. एस. रंगारी व भंडारा व गोंदिया जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)