शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

बॅन्ड स्पर्धेत सनफ्लॅग स्कूल राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:26 IST

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व उपसंचालक क्रीडा व युवक सेवा औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय बॅन्ड स्पर्धेत भंडारा येथील...

ठळक मुद्देक्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व उपसंचालक क्रीडा व युवक सेवा औरंगाबाद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व उपसंचालक क्रीडा व युवक सेवा औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय बॅन्ड स्पर्धेत भंडारा येथील सनफ्लॅग स्कूलच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे.विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे उपसंचालक राजकुमार माहादावाड व डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.उर्मिला मोराळे यांच्या उपस्थितीत सनफ्लॅग स्कूलच्या वादक चमुला राज्यस्तरावर सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. या चमुला मनोज दाढी, प्राचार्या अनुभा मंत्री, उपप्राचार्या वंदना आंबुलकर यांनी मार्गदर्शन केले. विजयी चमुला शाळेचे शिक्षक सुजित गजभिये, वंदना शर्मा, निकेश खेताडे यांचे सहकार्य लाभले.या विजयी चमुमध्ये मधुलिका मोटघरे, विधी धनवलकर, विनी धनवलकर, तृप्ती रोडके, सोजल तितरगार, सलोनी दरवरे, विधी तिवारी, पूर्वा कारेमोरे, सिया पारधी, साक्षी पाटील, रिचा सिंग, कुंजल ठाकूर, हर्षल सारवे, अनुष्का वैद्य, अरूंधती शर्मा, चैताली साखरकर, राशी गायधने, वैष्णवी भुरे, यामिनी सार्वे, ईशिका काटेखाये, कृतीका पात्रे यांचा सहभाग होता. आता ही चमू राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी जाणार आहे. या स्पर्धेत औरंगाबाद, जळगाव, सातारा, बीड, अहमदनगर, चंद्रपूर, अकोला, परभणी, नांदेड, जालना, रत्नागिरी, ठाणे आदी १३ जिल्ह्यांनी सहभाग घेतला होता.