शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक तणावात असलेल्या पोलीस शिपायाची सासरी येऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 16:33 IST

मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देपोलीस शिपायाने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गावालगतच्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. अंकुश श्रीराम बडगे (५५, रा. हिंगोली) असे मृत शिपायाचे नाव आहे. ही घटना लाखनी तालुक्यातील इसापूर येथे घडली. मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे.

पालांदूर (भंडारा) : महिन्याभरापूर्वी सासरी आलेल्या पोलीस शिपायाने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गावालगतच्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. अंकुश श्रीराम बडगे (५५, रा. हिंगोली) असे मृत शिपायाचे नाव आहे. ही घटना लाखनी तालुक्यातील इसापूर येथे घडली. मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे.हिंगोली जिल्ह्यातील नरसी (नामदेव) या पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई या पदावर अंकुश बडगे कार्यरत होते. गत महिन्याभरापासून ते सासुरवाडी असलेल्या इसापूर येथे आले होते. मात्र ते मानसिक तणावात असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. याच तणावात त्यांनी इसापूर येथील तलावात २२ फेब्रुवारीला रात्री १२ वाजताच्या सुमारास तलावात उडी घेतली. यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. पालांदूर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना मानसिक त्रासरविवारी सकाळी तलावातून बडगे यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी लाखनी येथे नेण्यात आले. मात्र तेथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह पालांदूरला न्यावे किंवा तिथून डॉक्टरांना बोलवावे, असे बोलले. आधीच दु:खात असलेल्या बडगे कुटुंबीयांना डॉक्टरांच्या अशा वागण्यानं आणखीच संकटात टाकले. याचवेळी पालांदूरचे पोलीस निरीक्षक अंबादास सुनगार यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा करून लाखनी ग्रामीण रुग्णालयातच उत्तरीय तपासणीची तयारी केली. परंतु तोपर्यंत नातेवाईकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. पालांदूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन गृह नसल्याने समस्या वाढली आहे. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते यांनी, पालांदूर येथे जागेची पुर्तता पुर्ण होताच शवविच्छेदन गृह बांधण्यात येईल, असे सांगितले.

पालांदूर येथील रुग्णालयात शवविच्छेदन गृह नाही. परिणामी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह लाखनी किंवा भंडारा येथे पाठवावे लागते. शवविच्छेदनगृहासाठी जागेची मागणी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे. मात्र यावर निर्णय झालेला नाही.- डॉ. ललित नाकाडेवैद्यकीय अधीक्षक पालांदूर

टॅग्स :Suicideआत्महत्या