लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : उसाला प्रती टन २६०० रूपये हमीभाव मानस ग्रुप साखर कारखान्याने जाहीर करावा, अशी मागणी माडगी दे. शिवारातील शेकडो शेतकºयांनी निवेदनाद्वारे केली आहे. शेतकºयांच्या शिष्टमंडळाने कारखान्याचे वरिष्ठ अधिकाºयांना भेटून चर्चा केली.मागील वर्षी मानस अॅग्रो कारखान्याने प्रती टन २१०० रूपये भाव दिला होता. सन २०१७-१८ च्या हंगामात किमान २६०० रूपये प्रती टन भत्तव जाहीर करावा, अशी मागणी माडगी, चारगाव, ढोरवाडा, सुकळी, रोहा, बाम्हणी, कोष्टी, बोरीसह तालुक्यातील शेतकºयांनी केली आहे. कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी यांना भेटून शेतकºयांच्या शिष्टमंडळाने निवेदन देवून चर्चा केली. वरिष्ठ अधिकाºयांनी शेतकºयांचे निवेदन नागपूर येथील मुख्य कार्यालयात पाठविण्यात येईल व त्यावर चर्चा करणार असल्याचे सांगितले. ऊस उत्पादन करतानी खर्च जास्त येवून नफा मिळत नाही.नगदी पिक म्हणून ऊस लागवड करण्यात आली, परंतु येथे नुकसान होत आहे. २६०० रूपये भाव न दिल्यास काराखन्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.यात विकास ठवकर, शिवशंकर बोंदरे, ज्ञानेश्वर भोयर, माणिक बोंदरे, लक्ष्मण माहुले, मनोहर वहिले, लक्ष्मण बोंदरे, देवराम बोंदरे, पुरूषोत्तम सेलोकर, युवराज बुधे, प्रमोद चावळेसह शेकडो शेतकºयांनी स्वाक्षरीनिशी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ऊस उत्पादक शेतकºयांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:16 IST
उसाला प्रती टन २६०० रूपये हमीभाव मानस ग्रुप साखर कारखान्याने जाहीर करावा, अशी मागणी माडगी दे. शिवारातील शेकडो शेतकºयांनी निवेदनाद्वारे केली आहे.
ऊस उत्पादक शेतकºयांचा एल्गार
ठळक मुद्देकारखान्याविरूद्ध आंदोलनाचा इशारा : २६०० रूपये किमान भावाची मागणी