जांब (लोहारा) : शासनाच्या अन्नपुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांना साखरेचा पुरवठा जानेवारी महिन्यापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गरजुंना ४५ ते ४0 रूपये प्रती किलो दराने बाजारातून साखर खरेदी करावी लागत आहे. बीपीएल, अंत्योदय, एपीएल तथा अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना साखरेपासून वंचित राहावे लागत आहे. या प्रकारामुळे लाभार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. जानेवारी महिन्यापाूसन शासनाच्या स्वस्त धान्य दुकानात साखरेचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. अन्न पुरवठा विभागातर्फे धान्य व साखरेचा पुरवठा केला जातो. जीवनावश्यक वस्तुच्या पुरवठय़ाची हमी शासनानी घेतली होती. सध्या धान्याचा पुरवठा स्वस्त धान्य दुकानातून केला जात आहे. अन्न सुरक्षा योजना सुरू झाल्यापासून शासनाने धान्य वितरणाबाबत नवीन निर्देश जारी केले. त्या निर्देशाबाबत एकवाक्यता दिसून येत नाही. निर्देश स्पष्ट नसल्याचे खासगीत बोलले जात आहे. अन्न सुरक्षा योजनेमध्ये गरजुंचे नावे सोडण्यात आले. श्रीमंताचे नावे समाविष्ट असल्याची चर्चा जोर धरत आहे. अंत्योदय व बीपीएल योजनेतील लाभार्थ्यांना गहू व तांदूळ असे ३५ किलो धान्य दिल्या जाते. अन्न सुरक्षा योजनेत बीपीएल व एपीएल कार्डधारकांना समावेश होणार असल्याची माहिती आहे. सरसकट ३५ किलो धान्य मिळणार की युनिटनुसार धान्य दिल्या जाणार? याविषयी संभ्रमाचे वातावरण आहे. यामुळे कुटुंबातील युनिटनुसार धान्य मिळणार असल्याची माहिती आहे. साखरेचा पुरवठा स्वस्त धान्य दुकानात पाठविणे बंद झाल्याची माहिती संबंधित अधिकार्यांकडून देण्यात आली. स्वस्त धान्य दुकानातील गरजूंना किमान प्रतिमहिना दोन ते तीन किलोग्रॅम साखर देण्याची गरज आहे. सरसकट साखर बंद करण्यामागचे कारण अद्याप कळले नाही. बाजारात भरमसाठ साखर उपलब्ध आहे. शासनाला ती का उपलब्ध करता आली नाही. लोकप्रतीनिधींनी येथे शासनाचे लक्ष वेधण्याची तसदी घेण्याची गरज आहे. (वार्ताहर)
तुमसर तालुक्यात साखर झाली कडू
By admin | Updated: May 13, 2014 23:16 IST