सखी मंच उपक्रम : व्यक्तीमत्व आणि राशीमधील गंमतीजमतीस प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसादभंडारा : कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तीमत्व व त्यांच्या राशीमधील गमतीजमती यावर आधारित सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य अरविंद पांडे आणि सुप्रसिद्ध कला दिग्दगर्शक संजय पेंडसे यांचे राशीवर आधारित मार्गदर्शनपर प्रस्तुतीवर सखीमंच सदस्य तसेच कार्यक्रमात रंगत आणली. दि.१० जून रोजी खात रोड स्थित मंगलमूर्ती सभागृहात राशी कवच कार्यक्रम सादर करण्यात आला. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या भोवती आपले आयुष्य फिरत असते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने तीनही काळाचा विचार करता प्रत्येक पाऊल टाकत असते. काल केलेल्या चुका आज करायच्या नाही आणि पुढेपण करायच्या नाही. असे ठरविणारे प्रत्येक व्यक्ती तिन्ही काळाचा विचार करीत असते. पण हा विचार करीत असताना नेमका राशीचा प्रभाव त्याच्या जीवनावर कसा व कधी होतो. आवडीनिवडी त्याचा व्यवसाय, प्रगती, नोकरी, यश या सर्व गोष्टींवर त्यांच्या कर्तृत्वाबरोबर त्याच्या नशिबाचा आणि राशीचा प्रभाव पडतो. हेच नेमके कार्यक्रमातून सांगण्यात आले आहे. याप्रसंगी सखीमंच सदस्य आणि कुटुंबासहीत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कलर्स प्रस्तूत राशीकवच कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य अरविंद पांडे, संजय पेंडसे, डी.एम. फॅमीली हॉटेलचे संचालक भरत मल्होत्रा, सौंदर्य तज्ज्ञ नंदिनी ब्राम्हणकर तसेच लोकमत कार्यक्रम प्रमुख मोहन धवड यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्योतिषाचार्य अरविंद पांडे यांनी प्रत्येक राशींचा सखींना अनुक्रमे मंचावर आमंत्रित करून त्यांच्या गुण दोषासहित भविष्य, भूत व वर्तमानकाळ याबद्दल पुरेपुर माहिती दिली. यातून जीवन सुरळीत, सोपे व आनंदमय कसे जगता येईल यावर सूचनाही दिल्या. कार्यक्रमाचे निवेदक संजय पेंडसे यांनी १२ राशींची माहिती देताना गमतीदार किस्से व अनुभव सखींना सांगितले. पती पत्नी, सासू सून अशा नात्यांमधून त्यांच्या राशी कोणत्या पद्धतीने वागण्यास भाग पाडतात याबद्दल सांगताच सखींमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला.यानंतर मंगला क्षीरसागर यांनी पंडीताची सुरेख भूमिका निभावली तसेच पूजा पांडे यांनी मंजुलिकाची भूमिका सादर करून नाट्यरुपांतराचे सुरेख सादरीकरण करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. तसेच अवघ्या दहा मिनिटामध्ये राशी कवचमधून देखावा सादर करून कधी चालू होणार याची सख्या आतुरतेने वाट पाहत आहेत. यशस्वितेसाठी सखीमंच संयोजिका नागपूर विभाग नेहा जोशी, भंडारा जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार, जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे यांनी परिश्रम घेतले. (मंच प्रतिनिधी)रसिकापर्यंत साद घालण्याचे कार्य कलर्स चॅनल व लोकमत सखी मंच प्रस्तुत पुन्हा एकदा नवीन संकल्पना, नवीन विषय घेऊन गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या भेटीला येत आहे. वेगळा विषय, वेगळी कथा, वेगळा बाज अशी कार्यक्रमाची प्रस्तुती होणार आहेच. पण कुटुंबासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय राशीकवच या कार्यक्रमाद्वारे रसिकापर्यंत साद घालण्याचे कार्य यानिमित्ताने होणार आहे. कवच कलर्स चे नवीन धारावाहिक पारीधी आणि राजवीर या जोडप्यांची ही कहाणी आहे. एका दृष्टात्मा मंजुलिका राजवीरच्या प्रेमात पडते आणि त्याला जिंकण्यासाठी पारीधीला आपल्या वशमध्ये करते. पारिधी मंजुलिकाच्या मोहजाळ्यातून बाहेर निघू शकेल का? पारिधीचे प्रेम बनू शकेल का? तिचे कवच काळ्या शक्तीपासून जाणून घेण्यासाठी बघायला विसरु नका, कलर्सची नवीन धारावाहिक कवच. ११ जून पासून दर शनिवारी रात्री ८ वाजता ही मालिका सुरु झालेली आहे आणि ही मालिका रविवारी रात्री ८ वाजता सुद्धा दाखविण्यात येणार आहे.
कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंच तर्फे राशी कवचचे भंडाऱ्यात यशस्वी आयोजन
By admin | Updated: June 12, 2016 00:28 IST