शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

उपसंरक्षकानी दिले चौकशीचे आदेश

By admin | Updated: April 23, 2016 00:42 IST

कांद्री वनपरिक्षेत्रातील आंबागड किल्ल्यालगतच्या जंगलात सागवान झाडाची कत्तल होत असून जंगलाचे रक्षक

दखल ‘लोकमत’ची : प्रकरण आंबागड येथील सागवान झाडाची कत्तलीचेविलास बन्सोड  उसर्रा कांद्री वनपरिक्षेत्रातील आंबागड किल्ल्यालगतच्या जंगलात सागवान झाडाची कत्तल होत असून जंगलाचे रक्षक पैसे घेवून भक्षकच बनले आहेत. या आशयाची ‘लोकमत’मध्ये बातमी प्रकाशित होताच सहायक उपसंरक्षकांनी सदर प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहे.आंबागड किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक झाडे आहेत. त्यापैकी मौल्यवान असलेल्या सागवान झाडे जास्तच आहेत. २३ मार्चपासून सदर जंगलात सागवान झाडाची कत्तल करणारी टोळी सक्रीय असून आतापर्यंत अनेक झाडांची कत्तल झाली असल्याची विश्वनीय सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कळते. या प्रकरणाची चौकशी केल्यास मोठे मासे अडकण्याची दाट शक्यता आहे. याच जंगलातील गट क्रमांक ३१७ च्या सीमेवर एक सागवान वृक्ष ज्याचा आकार अडीच फूट गोलाई व अंदाजे २२ फूट लांब इतका मौल्यवान सागवानाची कत्तल करताना आंबागड येथील देवस्थानचे पुजारी विश्वनाथ शरणागते यांना दिसले. घटनेची माहिती वनविभाग कांद्री यांना मिळाली त्यानंतर वनरक्षक घटनास्थळी आले पण त्यावेळी साधा पंचनामा केला नाही. मात्र झाडाची कत्तल करणाऱ्या व्यक्तीकडून चार हजार रूपये घेवून प्रकरण मिटवले.सदर प्रकरणाची सहायक उपवनसंरक्षक यांनी गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. सदर जंगलात आतापर्यंत किती झाडाचे कत्तल झाली असेल याची कल्पना करणे अशक्य आहे. दरम्यान सागवान झाडाची कत्तल करणारे यांना देवस्थानचे पुजारी विश्वनाथ शरणागते यांना दिसले व त्यांना ते ओळखतात इंदल ठाकरे व संपत इनवाते रा. आंबागड येथील व्यक्ती असून या दोघांचे नाव विश्वनाथ शरणागते यांनी उघड केल्यानंतर इंदल ठाकरे व संपत इनवाते यांनी विश्वनाथ शरणागते यांनी नाव का घेतले म्हणून विश्वनाथ शरणागते यास जीवे मारण्याची धमकी दिली. सदर प्रकरण विश्वनाथ शरणागते यांनी आंधळगाव पोलिसात इंदल ठाकरे व संपत इनवाते यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. आंधळगाव पोलिसांनी भादंवी ५०६ नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात केवळ आंबागड येथील व्यक्तीचा समावेश नसून जंगलातील राजरोसपणे कत्तल करणारे मोठे कंत्राटदार ज्यांनी जंगलातील वनसंपदा नष्ट केले व त्यांना सहकार्य करणारे जंगलातील रक्षकच पैसे घेवून भक्षक झाल्याने संपूर्ण वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास आणखी मोठे घबाड मिळण्याची दाट शक्यता आहे. चौकशी अंती काय होते याकडे वनप्रेमीचे लक्ष लागले आहे.