शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

रंगबिरंगी होळीसाठी सजली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 23:39 IST

होळी हा सवार्चा आनंदाचा सण आहे. या सणाची अनेक जण आतुरतेने वाट पहात असतात. प्रत्येकाने हा आनंदाचा आणि भेटीचा सण साजरा करावा, पण कोणतेही प्रदूषण होणार नाही, पाण्याची नासाडी होणार नाही, याची जाणीव ठेवून प्रदूषणमुक्त होळी साजरी करा, असे आवाहन विविध सामाजिक व पर्यावरणवादी संस्थांनी केले आहे.

ठळक मुद्देउलाढाल वाढली : रंगपंचमीसाठी बच्चेकंपनी सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : होळी-धुळवडीकरीता बाजारपेठ सजली असून उलाढाल वाढली आहे. रंग, पिचकारी, गाठींच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. येथील मोठा बाजार परिसर, गुजरी चौक, राजीव गांधी चौक परिसर, खात रोड परिसरात होळी-धुळवडीसाठीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या आहेत.विक्रीसाठी आलेल्या साहित्यांमध्ये पिचकारी, टँक, फुगे यांचे दर सुमारे १० ते २०० रुपयांपर्यंत आहेत. या सर्व पिचकारी, टँकवर सध्या कार्टून आणि मोटू-पतलू, छोा भीम यासह अन्य कॉर्टूनच्या प्रतीमा रेखाटल्या आहेत. छोटा भीम, अर्जून, हनुमान, राम अशा विविध कार्टूनच्या पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. बंदूक पिचकारी पारंपरिक असून त्याचे दर सुमारे १५ ते ५० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. अभिनेत्यांची छायाचित्रे असलेल्या पिचकाऱ्यांसह विविध फळे, बंदुक, मनी बँक, क्रिकेटच्या बॅटची प्रतिकृती असलेल्या पिचकाऱ्या बाजारात दिसून येत आहेत. रंगबिरंगी गुलाल, पाण्याचे रंग, डबीतील रंग, गोल्डन, स्टार्च रंगही विक्रीसाठी आले आहेत. यावर्षी रंगांना चांगली मागणी असल्याचे साहित्यविक्रेते नितीन कुंरजेकर यांनी सांगितले.गाठीचा गोडवा वाढलागाठी सुमारे ८० ते १०० रुपये प्रती किलोने विकल्या जात आहेत. गाठीचे हार ४० ते ६० रुपये आणि त्यापुढे वजनानुसार व नगानुसार गाठी बाजारात उपलब्ध आहेत.प्रदूषणमुक्त होळी साजरी करण्याचे आवाहनहोळी हा सवार्चा आनंदाचा सण आहे. या सणाची अनेक जण आतुरतेने वाट पहात असतात. प्रत्येकाने हा आनंदाचा आणि भेटीचा सण साजरा करावा, पण कोणतेही प्रदूषण होणार नाही, पाण्याची नासाडी होणार नाही, याची जाणीव ठेवून प्रदूषणमुक्त होळी साजरी करा, असे आवाहन विविध सामाजिक व पर्यावरणवादी संस्थांनी केले आहे. यासंदर्भात ग्रीन हेरीटेजचे संस्थापक मो.सईद शेख म्हणाले, होलिकोत्सव साजरा करताना आपल्या भागातील कचरा, वाईट प्रवृत्तीचा नाश करा, होळीसाठी झाडाची कत्तल करणे योग्य नाही. कोणतेही प्रदूषण आणि कुणास त्रास, इजा होणार नाही, याची दक्षताही नागरिकांनी घ्यावी. रासायनिक द्रव्ये मिसळलेले रंग वापरू नका असे आवाहनही त्यांनी केले.रंगांचे विविध पॅकेटआईस कूल, नैसर्गिक रंग, रासायनिक रंग अशा तीन पद्धतीतील रंग बाजारात उपलब्ध आहेत. आईस कूल रंग सुमारे २५ ते ५० रुपये, नैसर्गिक रंग सुमारे ५० ग्रॅमपासून पॅकेटमध्ये उपलब्ध असून त्याचे दर २० ते ५० रुपयांपर्यंत आहेत. रासायनिक रंगाच्या पुड्याही बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

टॅग्स :Holiहोळी